Govt School esakal
छत्रपती संभाजीनगर

School : नोकरी टिकवण्यासाठी शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात उन्हातान्हात फरपट; पालकांचा कल...

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरासह ग्रामीण भागातील पालकांचा खासगी इंग्रजी शाळामध्ये मुलांना दाखल करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे शासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा विद्यार्थीविना अडचणीत सापडल्या आहेत. विद्यार्थी शोधासाठी शिक्षकांना उन्हातान्हात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

जिल्हा परीषद आणि आदिवासी आश्रम शाळांमुळे गावागावात शिक्षणाचा प्रसार झाला. मात्र, त्याच शाळांसमोर अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शाळामधील शिक्षक आता गावांगावात जावून विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. नुकताच शाळांनी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करुन उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या आहेत. अनेक पालकांनी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्याला दाखल करण्यासाठी संबंधित शाळेतून दाखला काढण्यासाठी अर्ज दाखल केले आहे. असेच चालू राहिल्यास शाळेसमोर तुकडी टिकवून ठेवण्याचा प्रश्न निर्माण होईल.

तसेच गेल्या काही वर्षापासून शासनाने शाळांची खैरातच वाटली आहे. त्यामुळे दोन छोट्या गावाआड एक माध्यमिक शाळा उभी राहिलेली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे. जिल्हा परीषदेच्या शाळांची वाटचाल ही डिजिटलकडे होत आहे. असे असतानाही अनेक शाळांना विद्यार्थीच मिळत नाही.

अशातच शहरी भागातील शिक्षकही ग्रामीण भागातील गावात विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये पटसंख्या ही कागदोपत्रीच दाखवली जाते. यातून जास्तीची विद्यार्थी संख्या दाखविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

तुकडी रद्द होण्याची भीती

शाळांचे निकाल लागल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शिक्षक पालकांना पेटवून ‘टिसी’ मिळविण्याचा शर्तीने प्रयत्न करत आहेत. यात सर्वात मोठे आव्हान अनुदानित शाळांमधील शिक्षकांसमोर आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकडीची मान्यता रद्द होवून अतिरिक्त होण्याची भिती या शिक्षकांना आहे.

पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे

अनेक पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. त्यामुळे शासकीय अनुदानित शाळा वाढत्या स्पर्धेला तोंड देत विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी शिक्षक गावोगावी भटकंती करत आहेत. विद्यार्थ्यांची घरापासून शाळेपर्यंत ने-आण करण्याची व्यवस्थाही शाळेकडूनच करण्यात आली असल्याची मोठी बतावणी सर्वच शाळांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धारावीत रात्री १० नंतरही शिवसेनेचा प्रचार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफा अडवल्यानं शिंदेंवर दौरा अर्धवट सोडण्याची वेळ; VIDEO

Nagpur News: विद्यार्थी नसल्यानं मराठी शाळा बंद कराव्या लागतायत, राज्य सरकारचा युक्तिवाद, हायकोर्टानं फटकारलं..

Viral Video : भारत असुरक्षित म्हणतात अन् बांगलादेशात 'बाऊंड्री'वरून हाणामारी; क्रिकेट सामन्यात तुफान राडा, महिलांनाही धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : मनपा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस, मुख्यमंत्र्यांचा दुचाकीवरून रोड शो

घराच्या बांधकामावेळी 'या' ऐतिहासिक गावात सापडलं गुप्तधन; सोन्याच्या दागिन्यांनी भरलेलं तांब्याचं भांडं, गुप्तधन सापडताच आठवीत शिकणाऱ्या प्रज्वलनं...

SCROLL FOR NEXT