Aurangzeb controversial status row case registered in Ashti in Beed district Crime News  
मराठवाडा

Aurangzeb Controversial Status : कोल्हापूरनंतर आता बीड पेटणार? औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने आष्टी शहरात तणाव

रोहित कणसे

राज्यात औरंगजेबाचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून काही शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर येथे झालेल्या प्रकारानंतर आता बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात देखील तणावाचं वातावरण तयार झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात औरंगजेबाचं वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने रात्रीपासून तणावाचे वातावरण असून पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी संबंधीत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर आज, ९ जून रोजी आष्टी येथे बंद पाळण्यात आला आहे. या स्टेटसमुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांकडे देण्यात आली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी घडलेल्या घटनांप्रमाणे आष्टी येथील एका तरुणांने औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं होतं. ही बाब दुसऱ्या तरुणांच्या लक्षात आल्यानंतर लोका पोलिस स्टेशनमध्ये पोहचसे. अखेर रात्री उशीरा आष्टी पोलिस स्टेशनमध्ये संबंधीत तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची घोषणा केली त्यानंतर आजा आष्टी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या प्रकरामुळे शहरात तणावपूर्ण शांतत असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT