ausa
ausa ausa
मराठवाडा

कोरोनाकाळात औशाच्या नगराध्यक्षांचा मदतीचा हात; सहा हजार गरजू कुटुंबाला अन्न वाटप

जलील पठाण.

औसा (लातूर): कोरोनाच्या संकटामुळे (covid 19) अनेकांना आपले उद्योग व्यवसाय बंद ठेवण्याची पाळी आल्याने व संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेली टाळेबंदी यामुळे गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने अनेक गरीब कुटुंबाच्या चुली कशा पेटतील हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असताना औशाचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी जवळपास सहा हजार कुटुंबाला महिनाभर पुरेल एवडे अन्नधान्य वाटप करून या संकट काळात गरीब कुटुंबाच्या चुली पेटविण्याचे काम करून माणुसकीचा मोठा नमुना जगासमोर ठेवला आहे.

5 मे रोजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांचा वाढदिवस होता. त्यांनी हा वाढदिवस हार, तुरे, फ्लेक्स न लावता कोरोनाच्या संकट काळात गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी सहा हजार अन्नधान्याचे किट बनविले. यामध्ये १२ किलो तांदूळ, पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो तेल असे साधारण वीस ते तीस दिवस पुरेल एवडे अन्न पॅक करून ते गरीब कुटुंबापर्यंत पोहोचविले. सहा हजार किट पुरत नसल्याने त्यांनी अजून चार हजार किटचे नियोजन केले असून अजूनही ही मदत सुरूच आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हात थांबल्याने त्यांची होणारी परवड या मदतीने कांहीप्रमाणात का होईना थांबली आहे.

गेल्या वर्षीही केली होती मदत-

गेल्या वर्षी कोरोना काळात डॉ. श्री. शेख यांनी शहरातील गरीब कुटुंबाला आणि शहराबाहेर झोपड्यात राहणाऱ्या अनेक भिक्षुकाना त्यांच्या घरापर्यंत जाऊन अन्नधान्य आणि किराणा वाटप केला होता. हीच मदत त्यांनी यंदाही केल्याने याची चांगली चर्चा तालुक्यात सुरू आहे.

"संकट काळात एकमेकांना मदत करणे याचे बालकडू माझ्या वडिलांकडून मला मिळाले आहे. हाताला काम नसल्याने अनेकांना दैनंदिन जीवनात अडचणी येत आहेत त्या सोडविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजकीय हेतूने मी मदत करीत असल्याचा अपप्रचार काही करीत असले तरी प्रथम लोकांना मदत नंतर राजकारण हे माझे धोरण आहे".

-डॉ. अफसर शेख. नगराध्यक्ष औसा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT