accident 
मराठवाडा

औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जखमी

गौस शेख

औसा (लातूर): दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास औसा - तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील आशिव पाटी (ता. औसा) येथे घडली आहे. 

दिलीप मल्हारी मस्के (रा. चिंचोली काजळे ता. औसा) असे मृतकाचे नाव आहे. तर तुकाराम सरवदे (रा. उत्का ता. औसा) असे जखमीचे नाव आहे. 

चिंचोली काजळे (ता. औसा) येथील दिलीप मस्के व त्यांचे उत्का येथील नातेवाईक तुकाराम सरवदे हे दोघे आपल्या एमएच २४ बी. एफ. १९२१ या दुचाकीवरून रस्ता ओलांडून जात असताना तुळजापुरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच २० ई. जी. ६६८२ या मालवाहतूक टेम्पोने दुचाकीला आशिव पाटी येथे जोराची धडक दिली.

या अपघातात दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दिलीप मस्के यांच्या पायाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुकाराम सरवदे यांनाही मार लागल्याने त्यांच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT