Hingoli News 
मराठवाडा

हिंगोली जिल्‍ह्‍यात सरासरी ४०.४२ मिलीमीटर पाऊस, वाचा सविस्तर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्‍यात पावसाने सुरवात केली असून मृग नक्षत्रात पडत असलेल्या या पावसाने शेतकऱ्यातून समाधान मानले जात आहे. मागील चोवीस तासात जिल्‍ह्‍यात सरासरी ४०.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधीक पावसाची नोंद वसमत तालुक्‍यातील हयातनगर मंडळात झाली आहे.  

जिल्‍ह्‍यात हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ शहरासह तालुक्‍यातील सर्वदुर पाऊस झाला आहे. गुरूवारी (ता.११ जून) पहाटे सर्वत्र सुरू झालेला पाऊस सकाळी आठ वाजेपर्यत सुरू होता. दरम्‍यान जिल्‍ह्‍यात ४०.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात वसमत तालुक्‍यातील हयातनगर मंडळात ८२ तर टेंभुर्णी मंडळात ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

मंडळ निहाय झालेला पाऊस 

  • हिंगोली ३८.० मिलीमीटर 
  • खांबाळा ३५.०
  • माळहिवरा ५३.०
  • सिरसम बुद्रुक ५३.०
  • बासंबा ३८.०
  • नरसी नामदेव २८.०
  • डिग्रस १२.०

एकूण २५७.०० तर सरासरी ३६.७१ मिलीमीटर  

  • कळमनुरी मंडळात ६६.०
  • नांदापूर ६१.०
  • आखाडा बाळापूर १९.०
  • डोंगरकडा ३.०
  • वारंगाफाटा २४.०
  • वाकोडी ३१.०

एकूण २०४.० तर सरासरी ३४.० मिलीमीटर

  • सेनगाव मंडळात ६.०
  • गोरेगाव ४२.०
  • आजेगाव ११.०
  • साखरा ६.०
  • कनेरगावनाका ५.०
  • हत्ता १९.०

एकूण ८९.० तर सरासरी १४.८३ मिलीमीटर  

  • वसमत मंडळात ५५.० मिलीमीटर 
  • हट्टा ५५.०
  • गिरगाव १८.०
  • कुरुंदा ७७.०
  • टेंभुर्णी ८१.०
  • आंबा ३५.०
  • हयातनगर ८२.०

एकूण ४०३.० तर सरासरी ५७.५७ मिलीमीटर  

  • औंढा  नागनाथ मंडळात ४४.०
  • जवळा बाजार ६४.०
  • येहळेगाव ६३.०
  • साळणा ६५.०

एकूण २३६.०० सरासरी ५९.० मिलीमीटर 

कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा परिसरात असलेल्या देवजना येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे वाऱ्याने उडाली होती तर रस्‍त्‍यावरील झाडे देखील उन्मळून पडली आहेत. वसमत तालुक्‍यातील कुरुंदा येथे झालेल्या पावसाने जलेश्वर नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पुल वाहून गेल्याने टोकाईगड, डोंगरकडा, बाळापुर, दांडेगाव, गिरगाव, पार्डी, कानोसा,  सोमठाणा आदी गावाला जाणारा पर्यायी पुल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. 

पेरणीची लगबग झाली सुरु
गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने आजही पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. यावर्षी आतापर्यंत हवामान खात्याने दिलेले अंदाज खरे ठरल्याचे शेतकरी सांगत आहेत. या पावसाने शेतकऱ्यातून समाधान मानले जात असून पेरणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT