file photo 
मराठवाडा

Video : ‘ध्यान देऊन ऐका जरा... आला कोरोना’

गणेश पांडे

परभणी : गोंधळ ही कला प्राचीन काळापासून आहे. तो देविचा उपासक असल्यामुळे देवीचा गोंधळ करणे, गावोगावी जावून भिक्षा मागणे असा त्यांचा नित्य व्यवसाय आहे. गोंधळ सम्राट (कै.) राजाराम बापु कदम यांचा महान वारसा चालविणाऱ्या परभणीतील या कलावंतावर आज कोरोना विषाणु संसर्गामुळे उपासमारीचीवेळ आली असली तरी, सामाजिक दायित्व ओळखून या कलावंतांनी स्वताच्या कलेच्या माध्यमातून ‘ध्यान देऊन  ऐका जरा आला कोरोना, त्याने केली साऱ्यांचीच दैना...’, या गीतातून कोरोना विषयीच जनजागृती सुरु केली आहे.

गोंधळ सम्राट (कै.) राजाराम बापु कदम, आंतरराष्ट्रीय कलासंच व सेवाभावी संस्था परभणी, गोंधळ लोककलेच्या माध्यमातून कोरोना विषाणु संसर्ग काळात घ्यावयाची काळजी या संदर्भात जनजागृती करत आहे. गोंधळ सम्राट (कै.) राजारामबापु कदम, हे परभणी जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाचे नाव समजले जाते. गोंधळ या लोककलेला जागतीक प्रतिष्ठा मिळवून देऊन भारतीय संस्कृतीचा झेंडा अटकेपार रोवला.

शासनाच्या नियमाचे पालन

आजही बापुंचे नातू गुलाबराव राधाकिशनजी कदम, पंतू हरीभाऊ कदम, रामदास कदम हे वारसा जोपासत आहेत. आपल्या गोंधळ लोककलेच्या माध्यमातून कोरोना विषयी अनेक गीतांची रचना करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. ‘ध्यान देऊन  ऐका जरा आला कोरोना, त्याने केली साऱ्यांचीच दैना...’, या गीताच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाच्या उगमापासून ते उपयायोजनपर्यंतची सर्व माहिती सांगितली आहे.
कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी विविध उपाय योजनेची माहिती ते देत आहेत. कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्यात आले असून सर्व धार्मिक कार्यक्रम बंद झाले आहेत. आणि त्यामुळे शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करीत घरीच बसून, समाज सेवा म्हणून कोरोना विषयी जनजागृती संपूर्ण जिल्ह्यातील व तालुक्यातील खेडोपाड्यातील समस्त गोंधळी बांधव कलेच्या माध्यमातून करीत आहेत.


लॉकडाउनमुळे या कलावंताची उपासमार
कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे गोंधळी कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. सलग महिण्याभरापासून हे लॉकडाउन सुरु असल्याने अनेक धार्मिक कार्यक्रम ही थांबले आहेत. अश्या परिस्थितीमध्ये गोंधळी लोककलेतून स्वतासह कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या गोंधळी कलावंतावर आज घडीला उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यशासनाने या कलावंताची दखल घेवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी गोंधळसम्राट (कै.) राजाराम बापु कदम सेवाभावी संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

SCROLL FOR NEXT