मराठवाडा

पोलिसाची पाच लाखाची बॅग लंपास

सकाळवृत्तसेवा

नांदेड : मुलीच्या लग्नासाठी जीपीएफमधून एका पोलिसानी काढलेले पाच लाख रुपये अनोळखी चोरट्यानी भर दिवसा लंपास केले. ही घटना देगलूर शहरातील नवा मोंढा भागातील भाग्यलक्ष्मी बँकेसमोर शनिवारी (ता.20) दुपारी दीडच्या सुमारास घडली. 
मुक्रमाबाद ठाण्यात कार्यरत असलेला देगलूर न्यायालयातील पैरवी अधिकारी गुणाजी सुरनर (ब.न. 2000) यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी जीपीएफमधून पाच लाख रुपये काढून घेतले.

पाच हजाराच्या एक हजार नोटांचे बंडल त्यांनी एका बॅगमध्ये टाकून दुचाकी (एमएच26-एव्ही-6014) च्या डिक्कीत ठेवले. भाग्यलक्ष्मी बँकेसमोर एका एटीमधून चार हजार रुपये त्यांना काढायचे होते. म्हणून त्यांनी आपली दुचाकी एटीएमसमोर उभी करुन एटीएममध्ये गेले. त्यांच्या मागावर असलेल्या एका चोरट्याने डीक्की हातोहात फोडून पाच लाखाची बॅग लंपास केली.

हा प्रकार सिसीटीव्हीमध्ये कैद झाला. सुरनर यांनी लगेच पोलिस ठाणे देगलुर गाठले. तिथे घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर लगेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. फुटेज तपासले असता त्यात एक 20 ते 22 वयोगटातील चोरटा बॅग घेऊन जात असल्याचे दिसत आहे. गुणाजी सुरनर यांच्या फिर्यादीवरुन देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तपास फौजदार क्षिरसागर हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT