बीड - पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करताना अशोक लोढा व विजयकांत मुंडे.
बीड - पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करताना अशोक लोढा व विजयकांत मुंडे. 
मराठवाडा

बहुजनांचे नेतृत्व संपविण्याचे कारस्थान - शिवसंग्राम

सकाळवृत्तसेवा

जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांची टीका
बीड - जिल्हा परिषद सदस्य फोडणे म्हणजे, जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविण्याच्या कटाचा भाग आहे. काहींना बीड जिल्हा स्वतःची जहागिरी वाटत आहे. म्हणूनच स्वाभिमानी नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी केला. 

जिल्हा परिषदेतील शिवसंग्रामचे गटनेते अशोक लोढा व सदस्य विजयकांत मुंडे या दोघांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २४) शिवसंग्रामने पत्रकार परिषद घेऊन संतप्त प्रतिक्रिया दिली.  

‘भंगारात निघालेल्या लोखंडाचं भलं केलं असतानाही धोका देऊन आणि विश्वास तोडून आपण भंगारच आहोत हे फुटलेल्यांनी सिद्ध केलं’ असेही श्री. कोलंगडे यावेळी म्हणाले. श्री. मुंडे व श्री. लोढा यांना कोणी उमेदवारी द्यायला तयार नसताना विनायक मेटे यांनी उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले. या दोघांनी आधी राजीनामे द्यावे, मग जावे असेही ते म्हणाले. दोन्ही सदस्यांच्या गटांमध्ये आमदार विनायक मेटे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी मिळवून दिला. तरीही स्वार्थापोटी त्यांनी प्रवेश केला. यावेळी सय्यद नविदुज्जमा, नारायण काशिद, सुहास पाटील उपस्थित होते.

मित्र पक्षांचीच फोडाफोडी
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते घटक पक्षांना एकत्र घेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्याचे प्रयत्न करीत असतानाच, बीडमध्ये मित्र पक्षांचीच फोडाफोडी करून येथील भाजप नेतृत्व आपल्या कोणत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहे, असा टोलाही श्री. कोलंगडे यांनी लगावला.

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत दोघांचा भाजपत प्रवेश
बीड - शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचे दोन समर्थक, जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून शनिवारी (ता. २३) भाजपप्रवेश केला. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के यांनी मेटेंची साथ सोडलेली आहे.

आता त्यांच्यासोबत केवळ भारत काळे हे एकच सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय दुरावा आलेल्या पंकजा मुंडे व आमदार मेटे यांच्यात जिल्हा परिषद सत्तेच्या निमित्ताने मनोमिलन झाले; मात्र जिल्हा परिषदेच्या कारभारावरूनच पुन्हा दोघांत अंतर पडले. अलीकडे दोघांतील राजकीय संघर्ष टोकाला पोचला. दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून नेहमी अपमान, निधी वाटप, विकास कामांत अन्याय होत आहे. त्यांना राजकीय अहंकार असल्याचा थेट आरोप करत शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत; पण बीडमध्ये विरोधात अशी भूमिका विनायक मेटे यांनी जाहीर केली होती. या भूमिकेला मुंडे यांनी त्यांचेच दोन सदस्य फोडून चांगलाच धक्का दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT