Beed lok sabha election 2024 esakal
मराठवाडा

Bajarang Sonawane : जरांगेंच्या भेटीसाठी निघालेल्या नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात

बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा ६ हजार ५५३ मतांनी विजय झाला आहे. सोनवणे यांना ६ लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली. तर पंकजा मुंडे यांना ६ लाख ७७ हजार ३९७ मतं मिळाली आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये आणि शेवटपर्यंत काही होईल काय नाही, अशा परिस्थितीत बजरंग सोनवणेंचा विजय झाला आहे.

संतोष कानडे

Beed lok sabha election 2024 : बीड लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजयी ठरलेले बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती येत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातामध्ये काहीजण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय.

बीड लोकसभेत विजय झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणेंच्या गाडीला धडकली. त्यामुळे झालेल्या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत.

रात्री उशिरा धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कुणीही गंभीर जखमी नाही. जखमींवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा ६ हजार ५५३ मतांनी विजय झाला आहे. सोनवणे यांना ६ लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली. तर पंकजा मुंडे यांना ६ लाख ७७ हजार ३९७ मतं मिळाली आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये आणि शेवटपर्यंत काय होईल काय नाही, अशा परिस्थितीत बजरंग सोनवणेंचा विजय झाला आहे.

बीडमध्ये जरांगे फॅक्टर चालल्याचं बोललं जात आहे. बजरंग सोनवणे यांनीही ते कबुल केलं आहे. त्यामुळे खासदार सोनवणे हे जरांगेंच्या भेटीसाठी निघाले होते. त्यातच त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. परंतु सुदैवाने अप्रिय घटना घडली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT