amit
amit 
मराठवाडा

खासगी क्लासेसवर कायद्याने बंधने आणा - आ. अमित देशमुख

हरी तुगावकर

लातूर : स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा
गोळी झाडून खून झाला. ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष दिले
असते तर ही घटना टाळता आली असती. या घटनेमुळे लातूर पॅटर्नला धक्का बसला आहे. खासगी क्लासेसच्या संचालकांचा वावर पाहिला तर धास्ती बसावी असे आहेत. हे लातूरकरांसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे हे क्लासेसवर कायद्याची बंधने असावीत.हा व्यवसाय कायदेशीर चालावा या करीता काँग्रेस आंदोलन करेल. विधीमंडळातही हा प्रश्न उपस्थितीत केला जाईल, अशी माहिती आमदार अमित देशमुख यांनी येथे बुधवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली.

या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना दिलासा
देण्यासाठी शासन, प्रशासनाच्या पातळीवर बैठक घेवून धीर देण्याचा प्रयत्न
केल्याचे दिसत नाही. सध्याचे चित्र वाईट आहे. शस्त्रधारी प्राध्यापक
असतील तर यातून काय बोध घ्यायचा. दक्षता समित्या काय करीत आहेत. गेल्या काही महिन्यात १३ खून, २० खूनाचे प्रयत्न, १६ बलात्कार, सहा दरोडे, २३० चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाढती गुन्हेगारी पाहता पोलिस दल कोणाच्या सूचनावर काम करीत आहे. लातूरपासून ते नागपूरपर्यंत गुन्हेगारी वाढत आहे.

लातूरमध्ये काय घडत आहे याची मुख्यमंत्र्यांना कल्पना आहे का, असा
प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्रोटेक्शन मनी हा नवीन प्रकार लातुरात उदयास आला आहे. व्यावसायिक, जीवाची सुरक्षा का घ्यावयासी वाटते आहे. पोलिसांवरच विश्वास उडत चालला आहे. क्लासेसमध्ये पैसा असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत आहेत. याला प्रतिबंध घालण्याची गरज आहे. क्लासेसमध्ये किती विद्यार्थी असावेत, काय सुविधा असाव्यात या करीता कायदेशीर बंधने असले पाहिजेत, असे ते म्हणाले.

खूनाच्या घटनेमुळे लातूर पॅटर्नला धक्का बसला आहे. घटना उघडकीस आणणाऱयां पोलिसांचे कौतूक केले पाहिजे. पण ते दक्ष राहिले असते तर ही घटना टाळता आली असती. या घटनेतून सावरणे सावरणे सोपे नाही. या करीता सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, आयुक्तांशीही चर्चा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी मोईज शेख, अॅड. दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे, प्रा. स्मिता खानापूरे, ख्वाजाबानू अन्सारी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT