bribe esakal
मराठवाडा

Beed Crime : गोठवलेले बॅंक खाते पुर्ववत करण्यासाठी सायबर ठाण्यातील पोलिसाकडून अडीच लाखांच्या लाचेची मागणी

गोठवलेले बॅंक खाते पुर्ववत करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागून अडीच लाख रुपयांवर तडजोड.

सकाळ वृत्तसेवा

बीड - एका प्रकरणात गोठवलेले बॅंक खाते पुर्ववत करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागून अडीच लाख रुपयांवर तडजोड करुन रक्कम स्विकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे.

अशिष मुरलीधर वडमारे असे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आशिष वडमारे पोलीस हवालदार असून त्याची बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात नेमणूक आहे.

तक्रारदाराचा बॅटरी व इनव्हरटर विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने एका आरोपीला ईनव्हरटर व बॅटरी विकल्या होत्या. त्याचे बील आरोपीने त्याचे बॅंक खात्यातुन तक्रारदाराला अदा केले होते. कोणतीही खात्री न करता तक्रारदाराचे एका बॅंकेतील कॅश क्रेडिट खाते हे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे बीड यांच्याकडून गोठवण्यात आले होते.

सदरील गोठवण्यात आलेले बॅंक खाते पुर्ववत करण्यासाठी तक्रारदाराला आशिष वडमारे यांनी तीन लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने पंचासमक्ष याची खातरजमा केली. यावरुन आशिष वडमारे याच्यावर शिवाजी नगर पोलिस ठाणण्यात गुन्हा दाखल करणण्यात आला. संशयित आरेापी फरार आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, श्रीराम गीराम, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, श्री. निकाळजे, गणेश मेहेत्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

SCROLL FOR NEXT