file photo 
मराठवाडा

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना मदत करावी  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जखात्यातील दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा दिलासा देण्यासाठी बँकांसह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात आज महसुल, कृषी, सहकार व बॅंकांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांची बैठक आयोजीत केली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते.
बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक दिपक चव्हाण यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका सहनिबंधक, तालुका कृषी अधिकारी, सर्व बॅंकांचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.हेही

जिल्हाधिकारी श्री डोंगरे काय म्हणाले ...

जिल्हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कालबध्द पद्धतीने राबवुन पात्र लाभार्थ्यांना मुदतीत लाभ देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अडचणी न ठेवता सुटसुटीतपणा ठेवला आहे. येत्या ता. ७ जानेवारी रोजी आधारलिंक नसलेले बॅंक खाते निवडुन ते आधारला जोडण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रीया ता. ३१ मेपर्यंत पूर्ण करायची आहे. यानंतर जुनमध्ये शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप होईल. तालुकास्तरावर तहसिलदार, कृषी अधिकारी, सहायक निबंधक व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयातुन कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.

जिल्हा उपनिबंधकांची भुमिका महत्वाची 

प्रविण फडणीस यांनी कर्जमुक्ती योजनेविषयी तांत्रीक मुद्यांची माहिती पीपीटीच्या माध्यमातुन सविस्तर दिली. श्री. फडणीस म्हणाले, ही कर्जमुक्ती योजना वेळेत पुर्ण करायची आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडील ता. एक एप्रिल २०१५ ते ता. ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचे अल्प / अत्यल्प भूधारक याप्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत एक एप्रिल २०१५ ते ता. ३१ मार्च २०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, पुनर्गठन / फेरपुनर्गठनकरुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. अपात्रतेचे निकषाची माहिती सांगुन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांची सहमती आवश्यक
कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांची सहमती यावेळी घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक चुकला किंवा त्यांच्या खात्याची रक्कम चुकीची आली तर ते शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणुन देण्यात येणार आहे. यात पात्र शेतकऱ्यांची काही हरकत नसल्यास त्यांच्या हाताच्या बोटाचा ठसा घेवून त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. तसेच हरकत असलेल्या खात्याबाबत तालुका तसेच जिल्हा स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.

बॅंकांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे
शासनानचे धोरण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आहे. दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळणार असल्याने बॅंकांचीही वसुली होणार आहे. यामुळे बॅंकांनी थोड्या-थोडक्या रक्कमेचा विचार न करता बॅंकांनी कर्जमुक्तीबाबत व्यवसायीक धोरण ठेवून याकडे पाहावे. बॅंकांच्या सहकार्याशिवाय कर्जमाफी योजना यशस्वी होणार नाही, असे सांगत बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे. तसेच त्यांचे मत जाणुन त्यांचे समाधान करावे, असा सल्ला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT