ajintha ajintha
मराठवाडा

महाराष्ट्रातील 'असंही' एक गाव जिथं ना विज आहे ना पाण्याची सोय

अनाड येथील बरड वस्तीवर 30 वर्षांपासून मूलभूत सुविधांची वाणवा....!

जितेंद्र जोशी

अजिंठा (औरंगाबाद): मागील 30 वर्षांपासून विजेअभावी घरात अंधार,पाण्यासाठी अनवाणी भटकंती, रेशनकार्ड नसल्याने घरोघरी भिक्षा मागणे, घरातील अंधारात सर्पदंश होऊन मुलाचा मृत्यू, परिसरातील अस्वच्छतेमुळे कायमचेच आजारीपण, या समस्या कुणा जंगलातील वा दुर्गम भागातील नसून जगप्रसिद्ध अजिंठा गावापासून 2 की.मी.अंतरावर असणाऱ्या अनाड गावातील बरड वस्तीवरील आहेत. हे गाव केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात येते.

प्रत्येक निवडणूकीवेळी वस्तीवरील नागरिकांना फक्त आश्वासने देऊन केवळ मतांसाठी वापर केला जातो. मात्र निवडणुकीनंतर कुणीही वस्तीच्या समस्या निवारणासाठी पुढे येत नसल्याने या समस्या 30 वर्षांपासून कायम राहिल्या आहेत. बरड वस्तीवर मोठ्या प्रमाणात भटका जोशी समाज राहत असून सदर जागा तहसीलच्या मालकीची आहे. राहत असलेली 30 कुटुंबे ही बाहेर गावाहून येथे निर्वासित म्हणून आलेली आहे. तहसीलची मालकी असलेल्या जागेवर हे लोक वास्तव्य करतात त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा आता पर्यंत मिळाल्या नाही.

विज-पाणी नाही

"महाराष्ट्रात विज न पोहचलेली एकही जागा नाही" असे सांगून शासन जरी स्वतःची पाठ थोपटत असले तरी बरड वस्तीवरील नागरिकांसाठी विज हे एक मृगजळच ठरले आहे.वस्तीवरील नागरिक रात्रीच्या वेळी विजेविनाच राहतात. यामुळे रात्रीला सर्पदंश होऊन दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर घरात पंखे नसल्याने अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू ने एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. तर मुलांना अभ्यासासाठी सूर्यप्रकाशाची वाट पाहावी लागते. वस्तीवर कोणताही पाहुणा विजेअभावी मुक्कामी राहिल्याचे आठवत नसल्याचे नागरिक सांगतात. तर पिण्याच्या पाण्यासाठी महिला व मुलांना शेतवस्तीवरील विहिरीवर अनवाणी पायपीट करावी लागते. उन्हाळ्यात गावच्या लोकांना नळ येत असतांना बरड वस्तीवरील नागरिकांना मात्र दाहीदिशा भटकंती करावी लागते.

रेशनकार्ड अभावी भिक्षा मागण्याची वेळ

बरड वस्तीवरील अनेकांकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना कोरोनाकाळातही धान्य मिळाले नाही. कोरोना संक्रमणामूळे गावकऱ्यांनीही त्यांना भिक्षा देणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न रेशनकार्डमुळे आजही कायमच आहे.

गावातील तरुणांनी घेतला पुढाकार

या वर्षी अनाड गावात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यात निवडून गेलेले गजानन गदाई, मनीषा मानकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप मानकर, भटका जोशी समाज मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके, बाबासाहेब गोंडे हे तरुण वस्तीवरील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी शासन स्तरावर लढा देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT