Enviroment Minister For State Sanjay Bansode, Latur  
मराठवाडा

मजुरांचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्या, राज्यमंत्री बनसोडे यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

लातूर : सरकार आणि प्रशासन कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या उपाययोजनांचे तंतोतंत पालन सर्व नागरिकांनी करणे गरजेचे आहे. तसेच लातूर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या एकाही मजुराचे स्थलांतर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या मजुरांची लॉकडाऊन संपेपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
 
उदगीर विभागाअंतर्गत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बनसोडे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत उपविभागातील सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या लढाईत सक्रीय सहभागी व्हावे. यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच बसून रहावे, असे आवाहन बनसोडे यांनी केले. तसेच या काळात जिल्ह्यात व उदगीर उपविभागात बाहेरून आलेल्या सर्व मजुरांना प्रशासनाने निवारा, अन्न, पाणी, आरोग्य तपासणीच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच येथून एकही मजूर स्थलांतर करणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.    

आरोग्य विभागाने ज्या लोकांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्या सर्व लोकांनी बाहेर रस्त्यावर फिरु नये. घरातच बसून राहावे. आपल्या स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत सजग रहावे, असे आवाहन बनसोडे यांनी केले. उदगीर उपविभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे सर्व लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोचले पाहिजे याकरता योग्य ती काळजी घ्यावी.  सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, तसेच नागरिकांनी घराबाहेर न पडता घरपोच किराणा दुकानातील जीवनावश्यक वस्तू मागवाव्यात, असे बनसोडे यांनी स्पष्ट केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका

Maharashtra Weather Update : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT