Crime sakal
मराठवाडा

Bidkin Crime : पैशाच्या व्यवहाराच्या देवाण-घेवाणवरुन तरुणीस मारहाण; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

बिडकीन येथील पोलिस ठाणे हद्दीतील चितेगाव येथे एका २८ वर्षीय तरुणीस बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना आज उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - येथील पोलिस ठाणे हद्दीतील चितेगाव येथे एका २८ वर्षीय तरुणीस बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना आज (ता. ०४) शुक्रवार रोजी उघडकीस आली आहे.

मयत तरुणीचे नाव सुरेखा जालिंदर बारवकर (वय-२८ वर्षे), रा. शिरापुर घुमाळ, ता. शिरुर कासार, जिल्हा. बीड‌ असे आहे. तर संशयीत आरोपीचे नाव विश्वचंद्र सुखदेव गालफाडे (वय-३२ वर्षे), रा. पालशिंगन, ता. जि. बीड, ह. मु. नेहरु नगर, चितेगाव असे आहे.

दिनांक १९/०६/२०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास नेहरु नगर येथील विश्वचंद्र गालफाडे याच्या राहत्या घरी मयत सुरेखा बारवकर हिला घरी बोलावुन पैशाच्या देणे-घेणेच्या व्यवहाराच्या कारणावरून डोक्याच्या डाव्या बाजूस, तसेच डाव्या बाजुच्या बरगाड्यावर, व उजव्या पायाच्या नळगीवर कोणत्या तरी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला होता.

या मारहाणीत सदरची महिला गंभीरपणे जखमी झाली होती. सदर तरुणीस नातेवाईकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जालिंदर आश्रुबा बारवकर (वय-५२ वर्षे) यांनी आज दि. ०४ रोजी बिडकीन पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विश्वचंद्र सुखदेव गालफाडे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक माने हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT