Crimenews.jpg
Crimenews.jpg 
मराठवाडा

बीड : तो कॉलेजला जाताना नेहमीच त्रास द्यायचा, अखेर तिनेच संपविले तिचे आयुष्य..!

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : शहरातील जगतकर गल्लीत राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीस कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्या तरुणाविरुद्ध अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी वैजनाथ शहरात जगतकर गल्लीत राहणारी निकीता सखाराम जगतकर (वय२४) ही तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. कॉलेजला जात येत असताना तरुण उस्मान लतीफ शेख हा तिला सतत त्रास देत होता.

तसेच मोबाईल नंबर मिळवून फोनवरही सतत भेटण्याची विनंती करत होता. हा होणारा त्रास तरुणीने वडीलांना सांगितला. वडीलांनी त्याचा फोन घेऊ नको असा सल्ला दिला. वडील आपल्या नातेवाईकांना घेऊन उस्मान शेखच्या घरी जाणार होते. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
पण या तरूणीने आई वडील बाहेर गावी गेल्यानंतर १२ जूनला आत्महत्या केली. दुपारी आई, वडील आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वडीलांनी उस्मान शेख मुळेच मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून २४ जूनला संभाजीनगर पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT