Parli Accident News Sunil Udawant 
मराठवाडा

दोघा मित्रांची ताटातूट, टँकरखाली आल्याने एकाचा अवेळी मृत्यू

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : परळी-गंगाखेड रस्त्यावर एका विचित्र अपघातात दुचाकीस्वार जाग्यावर ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. परळी गंगाखेड रस्त्यावर औष्णिक विद्युत केंद्राच्या मिनी स्टोअरसमोर रविवारी (ता.चार) दुपारी तीनच्या सुमारास सुनील सुभाष उदावंत आपल्या मित्र उमेश विठ्ठल टाक याच्यासोबत परळीकडे येत असताना दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या व गंगाखेडहून येणारा दुचाकीस्वार सुनील सुभाष उदावंत (वय ३५) हा बाजूने जाणाऱ्या राखेच्या टँकरखाली गेल्याने या दुचाकीस्वाराच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या.

अपघातस्थळी मासांचा खच पडलेला दिसून येत होता. दुचाकीस्वारासोबत असलेला उमेश विठ्ठल टाक हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून दुचाकी व राखेचे टँकर ताब्यात घेतले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT