Power cut
Power cut esakal
मराठवाडा

बीड : आष्टीतील अनेक गावांत ३० तासांपासून बत्ती गुल

सकाळ वृत्तसेवा

आष्टी : आष्टी शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागांत बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा तीस तास उलटले तरी बंद आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महावितरणने केलेली देखभाल-दुरुस्तीची कामे व त्यावर झालेला खर्च नुसताच देखावा होता का? असा सवाल उपस्थित होत आहे. महावितरणकडून दरवर्षी मॉन्सूनपूर्व ३३ केव्ही, ११ केव्ही व इतर सर्व प्रकारची देखभाल-दुरुस्ती कामे उपाययोजनांतर्गत केला जातात. नागरिकांनी भरलेल्या बिलांतून ही दुरुस्तीकामे होतात. एकूण निधीपैकी ३३ टक्के रक्कम गावांसाठी व ३३ टक्के शहरी भागासाठी याप्रमाणे महावितरण खर्च केली जाते. दरम्यान, तालुक्यात नुकतीच महावितरणने देखभाल-दुरुस्तीची कामे केली. परंतु त्याचा काहीही परिणाम दिसून आला नाही. पाऊस पडताच लगेचच वीज गेली.

मोठ्या गावांमध्ये चार-पाच तासांनी वीज आली. तर अनेक गावांत गेल्या तीस तासांपासून अद्याप बत्ती गूलच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मॉन्सूनपूर्व देखभाल- दुरुस्तीसाठी महावितरणने खर्च केलेला निधी फक्त कागदोपत्रीच होता का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गावातील, शेतातील लोंबकळत असलेल्या तारा, वाकलेले पोल यांची दुरुस्ती केली जात नाही. झिरोवायरमनला पैसे देऊन शेतकऱ्यांना हे काम करून घ्यावे लागते. महावितरण अधिकारी या कामांचा पैसा नेमका कसा वापरतात याची चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रशासनाने जशी वीजबिल सक्ती करून वसुली केली तसे आता मॉन्सूनपूर्वीच्या दुरुस्ती कामांसाठी सक्ती करण्यात यावी. यासाठी आदेश देण्यात यावेत व कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

-अजिमोद्दीन शेख, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT