Beed lockdown. 
मराठवाडा

Breaking: बीडमध्ये अखेर 'लॉकडाउन'; जाणून घ्या कोणत्या सुविधा असणार सुरु

दत्ता देशमुख

बीड: कोरोना विषाणू संसर्गाचे वाढते रुग्ण आणि तपासणीतील वाढते शेकडा प्रमाण यामुळे अखेर जिल्ह्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गुरुवार - शुक्रवारच्या (ता. २६) मध्यरात्रीपासून सुरु होणारे लॉकडाऊन ता. चार एप्रिल पर्यंत असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिली.

लोकांना अनेक संधी दिल्या. अंशत: लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करुनही कारवाया केल्या नाही, तपासण्या करुन घेतल्या नाहीत म्हणून शेवटी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा पर्याय निवडल्याचे जिल्हाधिकारी श्री. जगताप यांनी सांगीतले.

श्री. जगताप यांनी बुधवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत लॉकडाऊनची घोषणा आणि त्यातील तरतुदींची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तहसिलदार श्री. वमने उपस्थित हेाते. लोकांनी नियमांचे व्यवस्थीत पालन केले तर दहा दिवसांचाच लॉकडाऊन असेल, अन्यथा कालावधीही वाढू शकतो, असे श्री. जगताप म्हणाले.

या कालावधीत लग्नसमारंभ, सभा, शाळा, हॉटेल, बाजारपेठा, महाविद्यालये, बगिचे, क्रिडांगणे, मॉर्निंग वॉक, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, प्रशिक्षण संस्था, खासगी वाहने बंद असतील. तर अत्यावश्यक सेवांची दुकाने, दवाखाने सुरु राहतील. खासगी अस्थापना पूर्णत: बंद राहणार असून शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितींमध्ये सुरु राहतील. या काळात निवडक पेट्रोल पंप सुरु राहतील. आजारी लोकांच्या तपासण्या, कोविड तपासण्या व लसीकरण सुरु राहील. अत्यावश्यक कारणांसाठी परवानग्या देण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत मांडणार ऐतिहासिक विधेयक; 'वंदे मातरम्'चा अपमान केल्यास काय शिक्षा होणार?

RBI News: देशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! टेंडर प्रक्रिया सुरू; कागदी नोटा बंद होणार? काय आहे RBI चा प्लॅन?

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका परिषदेच्या बैठकीत डीएमके आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी

'मला मुलाने ब्लॉक केलंय' सोनाली बेंद्रेला लेकानं सोशल मीडियावर केलय अनफ्रेंड, अभिनेत्री कारण सांगत म्हणाली...

IND vs ENG 3rd ODI: भारत-इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्याची पुन्हा वेळ बदलली; जाणून घ्या फ्रीमध्ये कुठे पाहता येईल मॅच

SCROLL FOR NEXT