maratha reservation
maratha reservation 
मराठवाडा

मराठा आरक्षणासाठी जालन्यानंतर आता बीडमध्येही जोरदार आंदोलन

वैजीनाथ जाधव

गेवराई (बीड): जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे (ता.20) जानेवारी रोजी सुरू झालेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. आता त्याचे लोण गेवराई तालुक्यात पोहचले असून तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे सोमवार (ता.एक) फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला पाच दिवस उलटून गेले आहेत. या आंदोलनास मराठा समाज बांधवांसह इतर समाजाचाही भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

आता तालुक्यातील ग्रामीण भागात देखील बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे चालू असलेल्या ठिय्या अदोलनाला पाच दिवसं झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच राहणार असल्याचे येथील मराठा बांधवांनी सांगितले आहे.

या ठिय्या आंदोलनात आता ग्रामीण भागातील मराठा बांधव देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. शुक्रवार(ता.पाच) रोजी तालुक्यातील उमापूर, राक्षसभुवन, सुरळेगाव, मालेगाव बु,गुळज गाव बंद ठेवून मराठा बांधवांनी मालेगाव येथे जाऊन या आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान शुक्रवार(ता.पाच)रोजी सकल मराठा समाज बांधव पुणे येथून चारचाकी पन्नास वाहनाची रॅली काढून मालेगाव खुर्द व जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथील आंदोलनात सहभागी झाले.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT