beed meeting 
मराठवाडा

'कारभार सुधारा, अन्यथा मला शासनाला बोलावे लागेल, केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं

दत्ता देशमुख

बीड: जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. एका रुग्णापासून एखाद्या - दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग व्हायचा, आता आठ ते दहा लोकांना होतोय. अशावेळी उपचारासाठी औरंगाबादवर विसंबून राहू नका, जिल्ह्यातच उपचारासाठी किमान १० हजार खाटा सज्ज ठेवा. यासाठी जे खाजगी डॉक्टर कोरोनावर उपचारासाठी तयार असतील त्यांना २४ तासात परवानगी द्या, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत कारभार सुधारा अन्यथा मला शासनाला बोलावे लागेल, असे खडे बोलही श्री. केंद्रेकर यांनी बुधवारी (ता. १७) आढावा बैठकीत सुनावले. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, उपायुक्त सुरेश बेदमुथा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत आदींची उपस्थिती होती.

श्री. केंद्रेकर म्हणाले, कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा जिल्ह्यातच निर्माण व्हाव्यात याकडे लक्ष द्या. कोविड केअर सेंटर सक्षम करा, तक्रारी येऊ देऊ नका. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांनीही याकडे लक्ष देण्याच्या सुचना श्री. केंद्रेकर यांनी दिल्या. बंद असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अद्ययावत ठेवा, खाजगी रुग्णालयातील खाटा वाढवा, खाजगी रुग्णालयांना कोरोना उपचाराची तातडीने परवानगी द्या, असे श्री. केंद्रेकर म्हणाले.

तपासण्यांचा वेग वाढावा यासाठी बीडला स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोगशाळा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिला. निधीसाठी प्रस्ताव द्या, लगेच मंजूर करतो पण आठवडाभराच्या आत प्रयोगशाळा कार्यन्वित करा. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा मास्क हाच एकमेव उपाय आहे. कोरोना वेगाने पसरतोय, त्यामुळे मास्क लावण्याची सक्ती करा, प्रसंगी कठोर कारवाई करा, त्यासाठी अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची सुचनाही त्यांनी दिली.

आरोग्य यंत्रणेबाबत नाराजी
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील उपचार, वेळेवर न येणारे डॉक्टर, कोरोना रुग्णांना वेळेवर न भेटणारे आणि निकृष्ट जेवण, आरोग्य केंद्रातील सुविधा याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. बैठकीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बंद का आहे असा प्रश्न आयुक्तांनी विचारल्यावर तो जुन्या सीएसनी बसविला आहे, त्यामुळे आम्हाला कंपनी माहित नाही ' अशी भूमिका मांडल्यानंतर कारकुनी बंद करा, तातडीने निर्णय घ्या' असेही आयुक्त श्री. केंद्रेकरांनी सुनावले. आरोग्य यंत्रणेचा कारभार सुधारला नाही तर मला शासनाला बोलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाने 'गार्ड ऑफ ऑनर' दिला, पण शेवटच्या ODI मध्येही एलिसा हेली भारताला नडली अन् दीडशतक ठोकलं; पाहा Video

Courtney Walsh: परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याची क्षमता बाळगा; झिम्बाब्वेचे गोलंदाजी प्रशिक्षक वॉल्श यांचा सल्ला

विवाहितेशी सोशल मीडियावर ओळख, मैत्रीतून प्रेमसंबंध; बोलायची बंद झाल्यानं गोळी झाडून हत्या, स्वत:लाही संपवलं

Latest Marathi News Update : धाराशिव जिल्ह्यातील परांड्यात ड्रग्स तस्करी

Homemade Blush: फक्त हा एक पदार्थ वापरुन तयार करा ब्लश; गाल दिसतील नैसर्गिक गुलाबी अन् फ्रेश

SCROLL FOR NEXT