Fertilizer 30 sacks seized in raid 
मराठवाडा

बीड : वाळू, कोळसामिश्रित खताची विक्री

माजलगावात प्रकार उघडकीस, छाप्यात तीस पोती जप्त

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : शहरात वाळू, कोळसामिश्रित खताची विक्री होत असल्याचे आढळताच दोन व्यापाऱ्यांच्या दुकानांवर गुरुवारी छापा टाकण्यात आला. त्यावेळी बोगस खताची तीस पोती आढळली. शहरामध्ये बोगस खत विक्रीच्या अनेक तक्रारी होत्या. प्लांटो नावाचे उसासाठी खत वापरले जाते. या कंपनीचा लोगो वापरून, कंपनीच्या बॅगप्रमाणे बनावट बॅगा बनवून खत विक्री होत असल्याबाबत कंपनीने न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याच्या अनुषंगाने न्यायालयाने विशेष इन्स्पेक्टर म्हणून संदीप हांगे यांची नियुक्ती केली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर स्वप्नील कोलते, संतोष जवंजाळ, अशोक कलापुरे, मनोज कोलते, सचिन अकोलकर, स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन गणेश कृषी सेवा केंद्र व इतर एका ठिकाणी छापे टाकले. यावेळी तीस पोती बोगस खत आढळले. त्यात कोळसा आणि वाळू आढळली. या बनावट प्रकारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. बनावट खताची पोती जप्त करण्यात आली. दरम्यान, शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना सतर्कता बाळगावी, बोगस खत विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे बाजार समितीचे सभापती संभाजी शेजूळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT