beed beed
मराठवाडा

बीडमधील वाढती कोरोना रुग्णवाढ ठरतेय चिंताजनक

कोरोनाचे नवीन १७० रुग्ण आढळले. कोरोनामुक्तांची संख्या तुलनेने कमी म्हणजे १०८ होती

सकाळ वृत्तसेवा

बीड: जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या दिडशे ते पावणेदोनशेंच्या घरात कायम आहे. त्यातच पॉझिटिव्हीटी रेटही अधूनमधून वाढत असून आष्टी तालुक्यातील संसर्गही कमी व्हायचे नाव घेत नाही. जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाग्रस्तांचे सहा तर म्युकरमायकोसिच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

कोरोनाचे नवीन १७० रुग्ण आढळले. कोरोनामुक्तांची संख्या तुलनेने कमी म्हणजे १०८ होती. सोमवारी ३५६१ लोकांच्या स्वॅब नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल मंगळवारी हाती आले. यात १७० पॉझिटिव्ह रुग्ण आणि तपासणीच्या तुलनेत ४.७७ टक्के एवढे होते. बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ६४ तर अंबाजोगाई आठ, बीड १९, धारुर तीन, गेवराई १८, केज ११, माजलगाव सात, परळी दोन, पाटोदा १४, शिरूर १२ व वडवणी तालुक्यातील १२ रुग्णांचा समावेश आहे.

नवीन सहा कोरोनाबळींच्या नोंदीसह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची संख्या २४९६ झाली. एकूण बाधितांची संख्या ९१ हजार ८५३ इतकी झाली. सध्या जिल्ह्यात एक हजार २३१ तर बाहेर जिल्ह्यात ४४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

म्युकरचा नवा एक रुग्ण व एक मृत्यू-
मंगळवारी म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या आजाराच्या आणखी एका रुग्णाची वाढ झाली. रुग्णसंख्या आता १८६ झाली आहे. तर, आणखी एका मृत्यूची नोंद होऊन मृत्यूंची संख्या ३२ झाली आहे. सध्या अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये ९३ तर जिल्हा रुग्णालयात दोन असे ९५ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर, आतापर्यंत ४७ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT