beed corona updates beed corona updates
मराठवाडा

Beed Corona Update: रुग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी रेट रोडावला, मृत्युसाखळी कायम

२४ तासांत कोरोनाचे ११९ रुग्ण आणि चार मृत्यू, आष्टी व बीडमध्ये पुन्हा वाढ

सकाळ वृत्तसेवा

२४ तासांत कोरोनाचे ११९ रुग्ण आणि चार मृत्यू, आष्टी व बीडमध्ये पुन्हा वाढ

बीड: Beed corona updates कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही दोनशेंच्या घरात असलेली रुग्णसंख्या आता खाली आली आहे. तर, पॉझिटिव्हिटी रेटही खालावला असला तरी मृत्युसाखळी तुटायचे नाव घेत नाही. शुक्रवारी (ता. १३) साडेसहा हजारांहून अधिक लोकांच्या तपासण्यांमध्ये केवळ ११९ रुग्ण आढळले. परंतु, चार कोरोनाबळींची नोंद झाली. तर, म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराचेही नवीन दोन रुग्ण आढळले. बीड व आष्टीतील कमी झालेल्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसरी लाट मे अखेरीस ओसरल्यानंतरही जून - जुलै या दोन महिन्यांत जिल्ह्याची रुग्णसंख्या कायम दीडशे ते सव्वा दोनशेंच्या घरात राहिली. तर, पॉझिटिव्हिटी रेटही पाच टक्क्यांच्या घरात होता. मात्र, मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण झाली असली तरी रोजच्या मृत्यूसंख्येत घट व्हायला तयार नाही.

दरम्यान, गुरुवारी (ता. १२) तब्बल ६६०२ लोकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. याच्या तपासणीचे अहवाल शुक्रवारी हाती आले. यामध्ये ११९ कोरोनाग्रस्त आढळले. तर, ६४८३ लोकांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण १.८० टक्के होते. पुन्हा एकदा आष्टीत सर्वाधिक ४२ आणि बीड तालुक्यात २९ रुग्ण आढळले. दोन्ही तालुक्यांत गुरुवारी रोडावलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढली. तर, अंबाजोगाईत सात, धारुरमध्ये आठ, गेवराईत तीन, माजलगावमध्ये चार, पाटोदात ११, शिरुरमध्ये चार, वडवणीत सहा रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्याची रुग्णसंख्या आता तब्बल ९९४४६ झाली. तर, शुक्रवारी अनेक दिवसानंतर नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा अधिक नोंदला गेला. शुक्रवारच्या १४० कोरोनामुक्तांसह जिल्ह्यात आतापर्यंत ९४ हजार ७५६ कोरोनामुक्तांची नोंद झाली. सध्या २०२० कोरोनाग्रस्त जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत.

मृत्युसत्र कायम; आणखी चार बळी-
कोरोना विषाणू संसर्गबाधीत रुग्णांची संख्या व पॉझिटिव्हिटी रेट मंदावला असला तरी मृत्यूसत्र कायम आहे. शुक्रवारीही आणखी चार कोरोनाबळींची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २६७० कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली.

म्युकरचेही आणखी दोन रुग्ण वाढले-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शेवटी डोके वर काढलेल्या म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या आजाराच्या नव्या रुग्णांची संख्या अलीकडे थांबली होती. पण, शुक्रवारी आणखी दोन रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात २१३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सध्या १५ रुग्ण उपचाराखाली आहेत. आतापर्यंत १४७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : अंधेरीत एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडल्याने खळबळ

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

SCROLL FOR NEXT