corona in beed
corona in beed corona in beed
मराठवाडा

Corona Update: बीडमधील वाढती रुग्णसंख्या ठरतेय चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा

आष्टी व बीड तालुक्यातील रुग्णसंख्या वाढतीच असून पॉझिटिव्हिटी रेट ४.११ वर पुढे गेला

बीड: Beed Covid 19 Update: कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट थांबणे तर दूरच ओसरण्याचेही नाव घ्यायला तयार नाही. गुरुवारीही (ता. पाच) रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ झाली. कोरोनाग्रस्तांचे मृत्यूसत्र सुरुच आहे. नवीन - जुने सहा कोरानाबळींची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आष्टी व बीड तालुक्यातील रुग्णसंख्या वाढतीच असून पॉझिटिव्हिटी रेट ४.११ वर पुढे गेला. बुधवारी (ता. चार) तपासणीसाठी घेतलेल्या चार हजार ७१२ लोकांच्या स्वॅब नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यामध्ये १९४ लोकांना कोरेानाची बाधा असल्याचे निदान झाले. तर, चार हजार ५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

नव्या रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील चार, आष्टीतील ५४, बीड ४३, धारूर १२, गेवराई सात, केज १५, माजलगाव सात, परळी एक, पाटोदा ३६, शिरूर चार , वडवणीतील ११ रूग्णांचा समावेश आहे. २४ तासांतील दोन तर जुने चार अशा एकूण सहा मृत्यूंची ऑनलाइन पोर्टलवर नोंद झाली. आता एकूण बाधितांची संख्या ९८ हजार १६८ एवढी झाली आहे. यापैकी ९३ हजार ६७८ जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत दोन हजार ६३३ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील रुग्णालयांत १८४८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली. दरम्यान, काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराच्या नव्या रुग्णांत किंवा मृत्यूमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT