Beed Crime sakal
मराठवाडा

Beed Crime : पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण ; दोन कोटी रुपये खंडणीची मागणी, सुटका करून गाठले पोलिस ठाणे

पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून बारा ते तेरा जणांनी अपहरण केले. त्यांच्याकडे दोन कोटींची खंडणीची मागणी केली. केज परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री हा प्रकार घडला.

सकाळ वृत्तसेवा

बीड : पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून बारा ते तेरा जणांनी अपहरण केले. त्यांच्याकडे दोन कोटींची खंडणीची मागणी केली. केज परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री हा प्रकार घडला. दरम्यान, दोघांनी आपली सुटका करून घेत केज पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

‘अवादा’ या पवनचक्की कंपनीच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले अधिकारी सुनील केदू शिंदे (टागोरनगर नाशिक, ह. मु. जालना रोड, बीड) आणि त्यांचे काही सहकारी वाहनातून मंगळवारी बीडकडून केजकडे येत होते. रात्री अकराच्या सुमारास मस्साजोग ते केज दरम्यान गंगा माउली साखर कारखान्याजवळच्या टोलनाका परिसरात जीपचालकाने (स्कॉर्पिओ-एमएच १५ ईबी २६८२) इशारा करून त्यांचे वाहन थांबविले.

त्यानुसार सुनील शिंदे यांनी वाहन थांबवले. ‘आपण अधिग्रहित करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे’, असे म्हणून रमेश घुले (रा. केज) याने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांसह सुनील शिंदे व त्यांच्या सहकाकऱ्यांचे अपहरण केले. त्यांना आपल्या जीपमध्ये बसवून त्यांना माजलगाव मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी (ता. पाथर्डी) येथे नेले. तेथे त्यांनी सुनील शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कंपनीचे काम करायचे असेल तर दोन कोटींची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली.

सुनील शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुटका करून घेत बुधवारी (ता. २९) केज पोलिस ठाण्यात रमेश घुले आणि त्याच्या अकरा ते बारा साथीदारांविरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

मुख्य संशयितास पोलिस कोठडी

गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांच्या आत या प्रकरणातील मुख्य संशयित रमेश घुले यास केज पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी (ता. २९) त्याला न्यायालयात हजर केले असता, एक जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Marathi Live Updates : मुसळधार पावसाने अंबा नदीचा जोडरस्ता जलमय, राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

Pudina Rice Recipe: नॉन-व्हेजलाही विसरायला लावेल गरमागरम पुदीना राईस; पावसाळ्यात लंचसाठी एकदा नक्की ट्राय करा

E20च्या वापरानं नुकसान नाही, मायलेजवर परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस, सुझुकीसह दिग्गज कंपन्यांनी दिली माहिती

Abhimanyu Elephant: म्हैसूर दसऱ्यात अंबारी वाहणाऱ्या ‘अभिमन्यू’चा सुळा तुटला, वन खात्याकडून उपचार सुरू

SCROLL FOR NEXT