Beed Crime esakal
मराठवाडा

Beed Crime : मद्यपी बापाच्या त्रासाला कंटाळून खून

रागाच्या भरात केली मारहाण, मृतदेह फेकला होता नदीत

सकाळ वृत्तसेवा

बीड - परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलिसांना इंद्रायणी नदीवरील पुलाखाली पाण्यात अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या अंगावरील गोंदलेल्या नावावरून पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. दारुड्या बापाच्या त्रासाला कंटाळून मुलानेच त्यांच्या डोक्यात लाकडाने मारून खून केल्याचे उघड झाले. मुंजा एकनाथ कटारे (वय ५२, रा.दिंद्रुड, ता. माजलगाव) असे मृताचे नाव आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

दैठणा ठाण्यातील उपनिरीक्षक संजय वळसे यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.१६) त्यांना दैठणा-गंगाखेड महामार्गावर इंद्रायणी नदीवरील पुलाखाली पाण्यात अनोळखी मृतदेह आढळून आला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुजलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला असता त्याच्या हातावर मुंजा एकनाथ कटारे असे गोंदलेले आढळून आले. शवविच्छेदनात सदरील प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मृत मुंजा कटारे यांचा मुलगा अशोक याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली.

अशोकला पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. मुंजा कटारे यास दारुचे व्यसन होते. १२ सप्टेंबर रोजी गावातील एका शाळेजवळ ते मद्यधुंद अवस्थेत दिसून आल्याने अशोकने रागाच्या भरात त्यांना मारहाण केली. या मारहाणीत मुंजा कटारे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वतःच्या कारमधून (एमएच-०२- डीएनः २९४१) मृतदेह इंद्रायणी नदीच्या पुलावर नेत खाली पाण्यात फेकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT