Gevrai Crime News 
मराठवाडा

भरदिवसा चोरट्यांनी सिनेस्टाईलने १५ लाख लुटले, व्यापाऱ्यांसह नागरिकांत खळबळ

वैजीनाथ जाधव

गेवराई (जि.बीड) - शहरापासून जवळच असलेल्या दोन वेगवेगळ्या भागात चोरटयांनी शनिवारी (ता.27) भरदिवसा दोन व्यापाऱ्यांना पंधरा लाखांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका कापसाच्या व्यापाऱ्यास दहा लाखाला तर सराफा व्यापाऱ्यास पाच लाख रुपयास लुटले असुन संबंधीत चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीचे अंदाजे पन्नास ग्रॅम सोने पळवल्याची माहिती समजते आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यत सुरु होती. या दोन घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील दैठण फाट्यावरून गेवराईकडे येत असतांना सराफ व्यापारी चंद्रकांत उदावंत यांच्या बॅगमधील पन्नास ग्रॅम सोने चोरटयांनी मोटारसायकलवरून येत बॅग हिसकावून घेत लुटले.यातील सोने पाच लाखांचा रुपये किमतीचे होते.तर नवीन नागझरी फाटा येथील हॉटेल डिसेंटजवळ कापूस व्यापारी हरिभाऊ गुट्टे (रा.वैजापूर, जि.औरंगाबाद ) यांच्याकडे कापसाची दहा लाखांची रक्कम बॅगमध्ये होती.ही रक्कम या चोरटयांनी सिनेस्टाईल चोरी करीत लांबवल्याने खळबळ उडाली.दोन्ही घटना दुपारी अडीच्या दरम्यान घडल्या असून  दिवसाढवळ्या दोन्ही घटना फिल्मीस्टाईलने घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर फिर्यादी यांनी पोलीसांत धाव घेतली असुन संबंधीत प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT