Beed News 
मराठवाडा

Beed News : धक्कादायक! लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी भावजीला गोवलं! HCकडून चौकशीचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

बीड : अत्याचार आणि बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांनी पीडितेला जबरदस्तीने आरोपी म्हणून तिच्या भावजीचे नाव घ्यायला लावले असे शपथपत्रंच खुद्द पीडितेने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दिले. यावरून न्यायालयाने या प्रकरणात पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पाटोदा पोलिस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला आहे.

ऑक्टोबर महिन्यात पाटोदा पोलिसात एका अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला होता. त्यावेळी पीडितेने कोणाचेही नाव घेतले नव्हते.

मात्र, त्यानंतर पाटोदा पोलिसांनी पीडितेच्या पुरवणी जबाबाआधारे पीडितेच्या भावजीला (बहिणीच्या पतीला) यात आरोपी केले होते. त्यानंतर आरोपीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. याची सुनावणी खंडपीठात न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्यासमोर झाली.

पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा

खंडपीठातील सुनावणीदरम्यान पीडितेनेच पोलिसांनी आपल्यावर याप्रकरणात आरोपीचे नाव घ्यायला दबाव आणल्याचे म्हटले. पोलिसांनी आपल्याला मावस भावाचे किंवा भावजीचे नाव घेण्यासाठी दबाव आणला आणि पोलिस ठाण्यात जिथे सीसीटीव्ही नाहीत, तेथे मारहाण केली, असेही पीडितेने न्यायालयात शपथपत्राद्वारे सांगितले.

तसेच स्वतः न्यायालयात उपस्थित राहून देखील ही माहिती दिली. यामुळे आता न्यायालयाने सदर प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर करतानाच तपासी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी बीडच्या पोलिस अधीक्षकांनी महिनाभराच्या आत सुरू करावी आणि तीन महिन्यांत पूर्ण करून चौकशी अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत. ॲड. शेकडे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT