beed crime news. 
मराठवाडा

पोलिस ठाण्यात पोलिसच असुरक्षित! बहाद्दराने पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत दिली जिवे मारण्याची धमकी!

दत्ता देशमुख

बीड: वाहनात इंधन भरल्यानंतर पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यासह मॅनेजरला शिवीगाळ केली. या प्रकरणी ठाण्यात आणलेल्या या महाभागांनी पोलिसांच्या अंगावर धाऊन जात त्यांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यावरुन शहर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक असाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

संदीपान बडगे व अभिषेक पवळ हे दोघे रविवारी (ता. १४) उशिरा जीप घेऊन (एम. एच. २३ ए. एक्स ५९३९) चर्‍हाटा फाट्यावरील पेट्रोलपंपावर गेले. इंधन भरल्यानंतर पैसे मागणाऱ्या आकाश शिंदे या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेले व्यवस्थापक अमोल कदम यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती शिवीजीनगर ठाण्याच्या पोलिसांना झाल्यानंतर ठाण्याचे जालिंदर बनसोडे व अन्य कर्मचारी त्याठिकाणी गेले. तेथे गेल्यानंतर शिंदे व कदम यांना ठाण्यात आणले.

त्यानंतर संदीपान बडगे आणि अभिषेक पवळ हे दोघे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले, त्यांनी बनसोडे यांचे गचुरे धरत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ठाण्यातच बडगे यांनी बनसोडे यांना शिव्या दिल्या. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बनसोडे यांच्या फिर्यादीवरून संदीपान बडगे व अभिषेक पवळ या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्यासह अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT