Beed Crime News Esakal
मराठवाडा

Beed Crime News : मुलाच्या घरच्यांना सांगूनही सुरू राहिली छेडछाड...; कंटाळून आठवीतील मुलीने संपवलं जीवन

Beed Crime News : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील औरंगपूर येथील इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Beed Crime News : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील औरंगपूर येथील इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीने ५ तारखेला विष प्राशन केले होतं.

त्यानंतर तिच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक 12 रोजी तिचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुंबेफळ येथील दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करत आहेत.

गंभीर बाब म्हणजे हा छेडछाडीचा प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांची समजून घातली होती. परंतु त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिल्याने या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपींविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडताना दिसून येत आहेत. दरम्यान पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT