crime 
मराठवाडा

सासूकडून जावयाचे सतराशे साठ लाड, दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये काढली वरात

दिगंबर देशमुख

सिरसाळा (बीड): घरात कोणी नसल्याची संधी साधत जावयाने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आला. याप्रकरणी सुनीता कांबळे,(सासू)रा.सातेफळ ता.अंबाजोगाई ह. मु. पोलिस काॅलनी सिरसाळा यांच्या फिर्यादीवरून सोमवारी(ता.15) रोजी सिरसाळा पोलिसात घटनेची नोंद झाली.

फिर्यादीची मुलगी सीमा मागील एक वर्षापासून या ठिकाणी राहते. तिचा पती गोपाळ उत्तम कसबे रा.वानटाकळी ता.परळी)हा नेहमी त्यांच्याकडे  येत असतो. गोपाळने आधारकार्ड व ईतर कागदपञे सासरवाडीत ठेवली होती. बुधवारी(ता.१०)सुनीता आणी कुटंबीय नातेवाईकाच्या लग्नासाठी सातेफळला गेले होते.

त्यावेळी गोपाळने सासरे खंडूराव कांबळे यांना फोन केला आणि कागदपञे मागीतली. त्यांनी घरी आल्यावर देतो असे सांगितले परंतू संतापलेल्या गोपाळने घराचे कुलुप तोडून पञ्याच्या पेटीत ठेवलेले त्याचे कागदपञे व रोख रक्कम वीस हजार रूपये चोरून लंपास झाल्याची घटना उघडकीस आली.

घरी परतल्यावर सुनीता कांबळे यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर त्यांनी सिरसाळा ठाण्यात फिर्याद दिली.त्यामुळे गोपाळ कसबेवर गुन्हा नोंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian nationals arrested USA: अमेरिकेत ३० भारतीय नागरिकांना अटक, व्यावसायिक ट्रक चालवताना पकडले; कोणता गुन्हा?

Christmas 2025: हिरव्या सँटाला लाल करण्यामागे कोका-कोलाचा हात...पण कसा? जाणून घ्या मनोरंजक गोष्ट

निपाणीत भीषण अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने प्रसिद्ध व्यावसायिक जागीच ठार, डोक्‍याचा झाला चेंदामेंदा, ओळखही पटत नव्हती!

Success Story : दिवंगत वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीने लढली..., कोल्हापूरच्या लेकीने PSI होत राज्याचा मानाचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ मिळवला बहुमान

Minister Jaykumar Gore: युती होणार, कोणीच रोखू शकत नाही; पालकमंत्री जयकुमार गोरे, युती रखडली का? यावर काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT