Beed Crime sakal
मराठवाडा

Beed Crime: भलत्याच व्यक्तीला उभा करून केली प्लॉटची रजिस्ट्री

Marathwada Crime: बीड तालुक्यात वासनवाडी येथील प्रकार; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Beed Latest News: मूळ मालकाऐवजी तिसऱ्याच व्यक्तिला रजिस्ट्री कार्यालयाात उभे करुन त्याचेच बनावट आधार कार्ड, भूखंडाचे खोटी कागदपत्रे तयार करुन रजीस्ट्री करुन देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.

शेख रियाज मोईजोद्दीन यांनी याबाबत फिर्याद दिली. अभिनाथ वसवकर याच्या विरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. वासनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ३९७८ चौरस फूट भूखंड आपल्या मालकीचा असल्याचे सांगून अभिनाथ वसवकर याने बनावट कागदपत्र व भलत्याच व्यक्तीला दस्त नोंदणी कार्यालयात उभा करुन रजिस्ट्री करुन दिली.

१२ लाख ५१ हजार रुपयांच्या व्यवहारात सुरुवातीला ता. २५ सप्टेंबर २०२३ रोजी अभिनाथ वसवकर यांनी शेख रियाज मोईजोद्दीन यांच्या हक्कात इसार पावती करुन दिली. यावेळी त्याने आठ लाख रुपये घेतले. उर्वरित चार लाख ५१ हजार रुपये खरेदीखताच्या वेळी देण्याचे ठरले. आठ नोव्हेंबर २०२३ ला मूळ मालकाऐवजी तिसऱ्याच व्यक्तीला रजिस्ट्री ऑफीसमध्ये आणून उभे करत त्यांचे बोगस आधारकार्ड व खोटे कागदपत्र आणून शेख रियाज यांच्या वडिलांच्या हक्कात कुलमुखत्यारपत्र लिहून दिले.

लिहून देणार व घेणार यांचे कबुली जबाबही घेऊन सह्या देखील केल्या. प्लॉट नावावर झाल्यानंतर शेख रियाज हे प्लॉटच्या ठिकाणी दोन जानेवारी २०२४ रोजी पत्र्याचे शेड मारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी आलेल्या चौघांनी हा प्लॉट आमचा आहे असे सांगून कागदपत्र दाखविले.

त्यावेळी कागदपत्रावरील फोटो विकास चंडिकादास कुलकर्णी यांचा नसून आधारकार्डही त्यांचे नसल्याचे त्या लोकांनी शेख यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शेख रियाज यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT