beed sakal
मराठवाडा

Beed Crime : सततच्या छेडछाडीमुळे मुलीची आत्महत्या; जबाबदार आरोपीस अटक करा; ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

एसपी कार्यालयासमोर नातेवाईक, ग्रामस्थांचे धरणे

सकाळ वृत्तसेवा

बीड, ता. १७ : शिक्षणासाठी भाड्याने खोली करून राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक झाली नाही.

त्याला जेरबंद करून मुलीला न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी भवनावाडी (ता. बीड) येथील मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

निकीता रेणाजी भोसले (वय १६, रा. भवानवाडी) हिने ११ जुलै रोजी शहरातील शिवाजी धांडेनगर भागात गळफास घेतला होता. निकीता ११ वीला शिकत होती. गावातीलच अमोल जगताप हा तिची सतत छेड काढत होता. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही.

आरोपीच्या अटकेसाठी भवानवाडीचे नागरिक जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. या वेळी रेणाजी भोसलेंसह आदी नागरीकांचा सहभाग असून त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT