संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीड जिल्ह्यात वीज अंगावर पडून सख्खे बहीण-भाऊ जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

वडवणी (जि. बीड) - आई-वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीण-भावाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोरवड येथे शुक्रवारी (ता. १२) घडली आहे. गुरुवारी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात पेरणी व कापूस लागवड सुरू आहे. शुक्रवारी मोरवड येथील विष्णू अंडील यांच्या शेतात कापूस लागवड सुरू होती. यामध्ये विष्णू अंडील यांचा मुलगा व मुलगी कामात मदत करत होते.

दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाल्याने आई-वडील व हे दोघे बहीणभाऊ निवाऱ्यासाठी झाडाच्या खाली थांबले होते. त्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने अशोक विष्णू अंडील (वय 17) व पूजा विष्णू अंडील (वय 15) यांच्या होरपळून जागीच मृत्यू झाला. अशोक हा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तर मुलगी पूजा गावातीलच विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती. मुलगा कोरोनामुळे गावी आला होता; मात्र त्याच्यावर काळाने घाव घातल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT