

Vaibhav Sooryavanshi Reaction After Getting India Jersey
Sakal
भारताचा उदयोन्मुख खेळाडू असलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकण्यास सज्ज आहे. त्याचं आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
त्याची भारताच्या आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौर्यातील टी२० मालिकेसाठी पहिल्यांदाच संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्याला जर खेळण्याची संधी मिळाली, तर तो भारतीय क्रिकेटमधील देखील ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. दरम्यान, नुकतीच वैभवला (Vaibhav Sooryavanshi) त्याची भारतीय संघाची जर्सी (Team India Jersey) देण्यात आली. त्याचा व्हिडिओही बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे.