Beed Five arrested in illegal abortion case esakal
मराठवाडा

अवैध गर्भपात प्रकरणी बीडमध्ये पाच ताब्यात

एजंट महिला, एका लॅब टेक्निशिअनचा समावेश आहे

सकाळ वृत्तसेवा

बीड : सीताबाई गणेश गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) हिचा अवैध गर्भपातामुळे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेतले. यात पती, सासरा, भाऊ तसेच एजंट महिला, एका लॅब टेक्निशिअनचा समावेश आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

एजंट म्हणून ताब्यात घेतलेल्या महिलेच्या घरात सोनोग्राफीसाठी लागणारे लिक्विड, गर्भपाताच्या गोळ्या, वैद्यकीय उपकरणे हाती लागली आहेत. या महिलेने अंगणवाडी सेविका पदाचा राजीनामा दिलेला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी गेवराई परिसरात विविध जबाब नोंदण्यासह या कारवाया केल्या. या साहित्यासह २८ लाख ३६ हजारांची रोकडही पथकाला मिळाली.

सीताबाई गाडे हिचा गर्भपातानंतर अतिरक्तस्रावामुळे रविवारी मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीत १८ आठवड्यांचा गर्भपात केल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंगनिदान, अवैध गर्भपात होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या पोलिस व आरोग्य यंत्रणा या प्रकरणाशी संबंधितांचा शोध घेत असली तरी या निमित्ताने मोठी साखळी हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृत महिलेच्या घरी येऊनच एका खासगी परिचारिकेने गर्भपात केल्याचेही समोर आले असून तिचा शोध सुरु आहे. बेकायदा गर्भलिंगनिदान, सोनोग्राफी, अवैध गर्भपातासाठी अन्य जिल्ह्यांतून डॉक्टर येत असल्याची माहितीही समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

SCROLL FOR NEXT