beed Girl child birth rate increases Birth rate decreases in 22 districts Sakal
मराठवाडा

Girl Child Birth Rate : बीडमध्ये वाढला मुलींचा जन्मदर; २२ जिल्ह्यांत जन्मदरात घट

अवैध गर्भलिंग निदान व गर्भपाताचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा टक्का वाढत असताना राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा दरहजारी जन्मदर (लिंग गुणोत्तर प्रमाण) घटल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीड : अवैध गर्भलिंग निदान व गर्भपाताचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा टक्का वाढत असताना राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा दरहजारी जन्मदर (लिंग गुणोत्तर प्रमाण) घटल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यातील १० जिल्ह्यांत दरहजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण नऊशेच्या घरात आहे. जालना जिल्ह्यात हे प्रमाण झपाट्याने घटल्याचे समोर आले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या पुणे येथील राज्य कुटुंबकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालकांनी २९ जानेवारीला ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विविध जिल्ह्यांतील विधी समुपदेशक व या यंत्रणेशी संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले.

या बैठकीच्या अनुषंगाने कुटुंबकल्याण, माता बालसंगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच महानगरपालिकांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तत्काळ उपाययोजना कराव्यात, दक्षता घेऊन कार्यवाही करावी, असे सूचित केले आहे.

जालना जिल्ह्यात सर्वाधिक घट

आढावा बैठकीत २०१९ व २०२२ मधील दरहजारी मुलीच्या जन्मदराची तुलना करण्यात आली. त्यातून विविध जिल्ह्यांचे प्रमाण काढण्यात आले. त्यावेळी २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे समोर आले.

यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक १६८ ने जन्मदर घटला आहे. या जिल्ह्यात २०१९ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण १०२२ होते. ते घटून ८५४ वर आले आहे. सिंधुदुर्ग, लातूर, सोलापूर, नाशिक, गडचिरोली, अहमदनगर, नागपूर, धुळे, परभणी, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, रायगड, यवतमाळ, धाराशिव, भंडारा, रत्नागिरी, गोंदिया, नंदुरबार, सांगली, नांदेड, अकोला या जिल्ह्यांतही मुलींचा जन्मदर घटत असल्याचे आकड्यांतून समोर आले आहे.

बीड जिल्ह्याचा अभिमान वाढतोय

गर्भलिंगनिदान व मुलींच्या गर्भपाताच्या प्रकरणांचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यात अवैध गर्भपात करताना महिलांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या. डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडेंसारख्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षाही झाल्या.

अलीकडेच गेवराईत आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेकायदा गर्भलिंगनिदानाचा भंडाफोडही केला. दरम्यान, २०१२ मध्ये जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ७९७ मुली असे प्रमाण होते. त्यानंतर जिल्ह्यात प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे २०१९ मध्ये मुलींचे प्रमाण ९६१ वर पोचले.

आताही हे लिंग गुणोत्तर प्रमाण ९३८ असे समाधानकारक आहे. प्रशासनाने सोनोग्राफी केंद्रे तसेच गर्भपात केंद्रांच्या वेळोवेळी केलेल्या तपासण्या, त्रुटीनंतर कारवाया आणि थेट फौजदारी गुन्ह्यांमुळे जिल्ह्याचा मुलींच्या प्रमाणाबाबतचा अभिमान आता वाढत आहे.

जिल्हानिहाय घटलेला मुलींचा जन्मदर (कंसात २०२२ चा जन्मदर)

  • जालना : १६८ (८५४)

  • अकोला : ५० (९०२)

  • नांदेड : ४९ (९०७)

  • सांगली : ४९ (८५७)

  • नंदुरबार : ४७ (९१६)

  • गोंदिया : ४२ (९४७)

  • रत्नागिरी : ४२ (९११)

  • भंडारा : ४० (९०५)

  • धाराशिव : ३९ (८७४)

  • यवतमाळ : ३९ (८९३)

  • रायगड : ३१ (९२४)

  • संभाजीनपगर : २३ (८८६)

  • अमरावती : २२ (९३०)

  • परभणी : २० (९१०)

  • धुळे : २० (८८३)

  • नागपूर : १९ (९२३)

  • अहमदनगर : १४ (८७९)

  • सिंधूदुर्ग : ११ (९५०)

  • लातूर : १२ (९१८)

  • सोलापूर : १२ (९११)

  • नाशिक : १३ (८९७)

  • गडचिरोली : १४ (९४०)

आरोग्य विभागाने महसूल व पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवायांमुळे बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपाताला पायबंद बसला. एका तक्रारीनुसार बेकायदा गर्भलिंगनिदानाचे रॅकेट नुकतेच उघडकीस आणले. त्यामुळे जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर आता चांगला (हजारामागे ९३८) आहे.

- डॉ. अशोक बडे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Pune Crime : 11 वर्षांच्या मुलीचे कपडे बदलताना फोटो काढले, ब्लॅकमेल करत ५ वर्षे अत्याचार; ४४ वर्षीय नराधमाला बेड्या

Latest Marathi News Live Updates : वसई-विरार इमारातींमध्ये पाणी शिरले

Asia Cup 2025: सर्व मूर्ख आहेत, बाबर आझमची महानता यांना माहीत नाही... पाकिस्तान सिलेक्टरवर भडकला माजी दिग्गज

4 वेळा फाईल परत पाठवलेली, शिरसाटांनी CIDCO अध्यक्ष होताच पहिल्या बैठकीत मंजूर केली; ५ हजार कोटींची जमीन एका कुटुंबाला दिली

SCROLL FOR NEXT