Sucide case 
मराठवाडा

बीड : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

आत्महत्या पुर्वी केली व्हिडीओ क्लिप व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : पत्नीच्या गैर वर्तणुकीस व जाचास कंटाळलेल्या पतीने आत्महत्या पुर्वी व्हिडीओ क्लिप तयार करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ता.19 आँगस्ट घडली होती. या प्रकरणी मयताच्या वडीलाच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसात पत्नी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अधिक माहीती अशी की, गेवराई रोडवरील फुले पिंपळगाव शिवारातील मोकळ्या जागेवर पाल टाकुन राहत असलेल्या आकाश सुरेश मुळे(25)मुळ रा.बावणे पांगरी ता.बदनापुर जि.जालना या युवकाने ता,19 आँगस्ट ला जायकवाडी उजवा कालवा गेट क्र.10 ला गळफास घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद झाली होती.

माञ मयत आकाशने आत्महत्या करण्या पुर्वी मोबाईल वर व्हिडीओ क्लिप तयार करुन ती नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल केली असल्याचे उघडकीस आल्याने नातेवाईकांनी सोमवारी शहर पोलीस ठाणे गाठत सदर क्लिप शहर पोलीसांना दाखवत दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावरुन पोलीसांनी मयताचे वडील सुरेश मुळे यांच्या फिर्यादीवरुन पत्नी मंदा आकाश मुळे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

Mumbai Sipahi Recruitment: शिपायाच्या ८८७ जागांसाठी २ लाख १४ हजार अर्ज; मुंबई उच्च न्यायालयातील भरतीमधील धक्कादायक स्थिती, बेरोजगारीचे वास्तव!

Niphad News : 'केस कापायला नेतो' सांगून घराबाहेर पडले, अन काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली; निफाडमधील हृदयद्रावक घटना

Farsawale Baba: कोण होते 'फरसा वाले बाबा'? त्यांच्या ४०० गायींचं काय होणार? योगी सरकारने घेतला मोठा निर्णय, दोषींवर कारवाई

SCROLL FOR NEXT