covid ward beed 
मराठवाडा

शेवटच्या क्षणी आईसोबत राहण्यासाठी मुलगा राहतोय तिच्यासोबत कोवीड वार्डात

दत्ता देशमुख

बीड: स्वतःच्या आई - वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आणि आपल्या कामामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारालाही न जाणारी मुलं या जगात आहेत. पण, आई जगाचा निरोप घेणार आहे हे माहित असूनही आणि कोरोना संसर्गाची भीती असतानाही शेवटच्या क्षणांत आईच्या डोळ्यासमोर राहण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणाऱ्या मुलाची ही कहानी.

कोवीड वार्डातील एका कॉटखाली कोपऱ्यात चादर पांघरुन चोरासारख लपलेला तो जिल्हाधिकाऱ्यांचे पाय धरतो आणि म्हणतो, ‘साहेब आई जाणार आहे हे मला माहीत आहे. पण, मी तीला एकटीला सोडून कसा जाऊ, शेवटच्या क्षणांत तरी मुलगा सोबत असल्याच तीला समाधान मिळेल. मला इथे थांबू द्या हो साहेब.’ मुलाची आईविषयी असलेली ओढ, प्रेम आणि तळमळ पाहून श्री. जगताप यांच्यासह अधिकाऱ्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

झालं असं की, रुग्णांशी संवाद साधून उपचाराबाबत माहिती घेत असतानाच जिल्हाधिकऱ्यांना एका कोपऱ्यातील कॉटखाली चादरेची भिंडोळी दिसली. पण, त्याच्या हालचाली होत असल्याने जगताप यांची नजर त्यावर पडली. ‘अरे काय आहे ते पहा’ असे त्यांनी फर्मान सोडताच एकाने चादर बाजूला सारली तर आतमध्ये एक साठीतला व्यक्ती लपून बसलेला होता. या प्रकाराने जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच अवाक झाले आणि संतापलेही. कोण तु, इथे का लपून बसलास, याला बाहेर काढा, अशा प्रश्न आणि सुचनांची सरबत्ती सुरु झाली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेमुळे लगेच शिपायांनी त्याला पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न सुरु करताच त्याने जिल्हाधिकाऱ्यांचे पाय धरले आणि ‘साहेब ती माझी आई आहे, मला माहितीय ती वाचणार नाही, ती जाणार आहे, पण मी तीला एकटीला सोडून कसा जाऊ. शेवटच्या दिवसांत तरी मुलगा सोबत असल्याचं तीला समाधान मिळेल म्हणून मला इथे थांबू द्या’ अशी विनवणी त्याने केली.

त्यावर अधिकारी असले तरी उपस्थित सर्वच माणसंच होती. त्यांच्यातही संवेदना होत्या. मुलाची आईविषयी असलेली ओढ, तळमळ पाहून त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पानावल्या. ‘थांब पण मास्क, सॅनिटायझर वापर’, तुझेही वय जास्त आहे, काळजी घे, येवढेच शब्द सर्वांच्या तोंडून निघाले. मुलाच्या आईविषयीच्या प्रेमापोटी कोविड वार्डात इतरांना प्रवेश नाही हा नियमही इथे अपवाद म्हणून बाजूला सारण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघात! डंपरच्या धडकेत महिला ठार; चार वर्षांचा मुलगा आईच्या प्रतीक्षेत, पतीचा आक्रोश

मनपा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर! राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात? आचारसंहिता होणार लागू

Latest Marathi News Live Update: लातूरमधील औसा तालुक्यात कारला भीषण आग, चालकाचा होरपळून मृत्यू

Lionel Messi Mumbai Tour: सचिन तेंडुलकरसोबत भेट ते प्रदर्शनीय सामना... लिओनेल मेस्सीच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एका क्लिकवर

Tips For JEE Main Preparation: 12वी बोर्ड परीक्षेसोबत JEE Main ची तयारी कशी करावी? जाणून घ्या एक्सपर्टकडून

SCROLL FOR NEXT