covid 
मराठवाडा

धक्कादायक! कोरोना रुग्णांची उघड्यावरच 'लोटा परेड'; कोविड हेल्थ सेंटरमधील परिस्थिती

अनिरुध्द धर्माधिकारी

आष्टी (बीड): येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांची शौचालया अभावी हेळसांड होत आहे. सेंटरमधील दोन्ही शौचालये बंद अवस्थेत असल्याने तसेच पाण्याची सोयही नसल्याने या रुग्णांना बाहेर उघड्यावर शौचविधीसाठी जावे लागत आहे. या प्रकारामुळे रुग्ण तसेच नातेवाइकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. या सेंटरची रुग्ण क्षमता ३० एवढी असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हे सेंटर सध्या अपुरे पडू लागले आहे. सध्या या सेंटरमध्ये ४० च्या आसपास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांची मात्र सोयीसुविधांअभावी मोठी हेळसांड सुरू आहे.

सेंटरमध्ये असलेली दोन्ही शौचालये बंद अवस्थेत आहेत. तसेच पाण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे लक्षणे नसणाऱ्या, गंभीर तसेच अतिगंभीर रुग्णांनाही दुखणे विसरून बाहेर खुल्या मैदानात शौचविधीसाठी जावे लागत आहे. याबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे वारंवार मागण्या करूनही सोय उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने रुग्णांमधून संताप व्यक्त होत आहे.

अंघोळीचीही घ्यावी लागतेय 'गोळी'
लक्षणे नसणाऱ्या परंतु कोरोना अहवाल पॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना रोज पुरेसा आहार, औषधोपचार व स्वच्छता गरजेची असते. आष्टीच्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी अंघोळीसाठी गरम पाणी तर सोडा स्नानगृह व थंड पाणीही नाही. त्यामुळे दाखल झाल्यानंतर डिस्चार्ज होईपर्यंत उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्याबरोबरच चक्क अंघोळीचीही गोळी लागत आहे.

कोविड हेल्थ सेंटरमधील शौचालये सध्या नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती करावी अथवा नवीन शौचालये तयार करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. पाण्याची सोयीसाठी नगर पंचायतीशी पत्रव्यवहार झाला असून अद्याप कार्यवाही न झाल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामाना करावा लागत आहे. आदेश प्राप्त होताच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
डॉ. राहुल टेकाडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आष्टी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT