kej  
मराठवाडा

धक्कादायक! नदीत आढळला कुजलेल्या अवस्थेत पुरूषाचा मृतदेह

रामदास साबळे

केज (बीड): शहरातील अल्लाउद्दीन नगरलगत वाहणाऱ्या लेंडी नदीत कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला आहे. शनिवारी (ता.०६) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास  हा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती समजताच शहरात एकच  खळबळ उडाली आहे. 

शहरातील भीमनगर लगतच्या स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पात्रात हा मृतदेह आढळला आहे. अंदाजे पंचेचाळीस वर्ष वयाच्या अनोळखी पुरुषाचे प्रेत पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगत होते. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील युन्नूस शेख व गुलाब गुंड हे दोघे दुपारी शेतात गेले असता त्यांना  नदीच्या पात्रात मृतदेह पाण्यात तरंगाताना दिसला. त्यांनी याची माहिती केज पोलिस ठाण्याला कळविताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आय-बाईक विभागाचे कर्मचारी वैभव राऊत व पप्पू अहंकारे हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर प्रेत पाण्याच्या बाहेर काढण्याचा पोलिस प्रयत्न करत असून त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून ही घटना घातपात की अपघात आहे, याची माहिती पोलिस तपासानंतर समोर येणार आहे. या घटनेची शहरात माहिती समजताच एकच खळबळ उडाली आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

स्टार प्रवाहवरील या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न ! ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाशी बांधली लग्नगाठ

Nagpur News : नागपुरात 'डिजिटल अरेस्ट'चा थरार! आतंकवादाच्या खोट्या केसची भीती दाखवून महिलेला १३ लाखांचा गंडा; बनावट 'अरेस्ट ऑर्डर'ने उडविली झोप

Ambethan News : भामा आसखेडमध्ये 'साठीत' साठा, पण भविष्यात चिंतेची लाट! मोठ्या पाणी योजना सुरू होताच धरण तळ गाठणार; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Jayant Patil : आदिवासी जमिनींचा मोठा घोटाळा उघडकीस? सभागृहात घणाघाती आवाज; जयंत पाटील यांचा प्रशासनावर थेट हल्ला!

SCROLL FOR NEXT