pipe leak. 
मराठवाडा

मांजरा धरणाचा उजवा कालवा फुटला; लाखो लिटर पाण्याची नासाडी 

रामदास साबळे

केज (बीड): तालुक्यातील मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाणी देण्याच्या उजव्या कालव्याला भगदाड पडून त्यातून शुक्रवार (ता.२६) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. कालव्याच्या दुरूस्ती व देखभालीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील मांजरा धरण हे बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सिंचन व पाणीपुरवठा योजनेकरिता वरदान ठरले आहे. त्यातच यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस व इतर पिकांना पाणी देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी कालव्यातून बावीस मार्चपासून पाणी सोडण्यात आले आहे.

मात्र आवाड शिरपुरा शिवारात शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उजव्या कालव्याला भगदाड पडून त्यातून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे कालव्यातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांच्या पिकांना उपयोग न होता पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पाटबंधारे विभागाचे कालव्याच्या दुरूस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. तात्काळ कालव्याची दुरुस्ती करून नियमित शेतीच्या सिंचनासाठी कालव्यातून पाणी अवर्तने सोडण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज्यात 40 ते 60 लाख मतदार वाढले; राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर जोरदार टीका

Mumbai Morcha: गर्जना मोर्चात 'डुप्लिकेट ज्ञानेश कुमार', मनसैनिकांनी थेट दोरीनेच बांधलं; Video Viral

रश्मिकाचं सासूसोबत कसं आहे नातं? विजय दोघींबद्दल बोलताना म्हणाला, 'त्या नेहमीच...'

शहीद जवानाचे पार्थिव नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, मुलासह चौघांचा मृत्यू; एक्सप्रेसवेवर मृत्यूचं तांडव

धोनीपासून सुरू झालेली तीच परंपरा, आता शुभमन गिलनेही जपली! ट्रॉफी स्वतःकडे न ठेवता आकिब नबीच्या हातात दिली अन् VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT