parali vaidyanath. 
मराठवाडा

आजपासून परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर शिवभक्तांना दर्शनासाठी खूले

प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड): येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांना दर्शनासाठी ४ एप्रिलपर्यंत मंदिर बंद करण्यात आले होते. मात्र सोमवारी (ता.०५) पासून शिवभक्तांना दर्शनासाठी पुन्हा सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी रविवारी (ता.०४)) आदेशाद्वारे कळवले आहे. तब्बल २६ दिवसानंतर प्रभू वैद्यनाथाचे मंदिर शिवभक्तांना दर्शनासाठी खूले करण्यात आल्याने शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव यंदा कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने हा रद्द करून भाविकांना दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिर पूर्णपणे ८ ते १६ मार्च दरम्यान  बंद करण्यात आले होते. १६ मार्च नंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने त्यास २२ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी जिल्ह्यात वाढतच चालल्याने वैद्यनाथ मंदिर बंदला ४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मात्र रविवारी (ता.०४) काढलेल्या आदेशानुसार प्रभू वैद्यनाथ मंदिर व आंबेजोगाई येथील श्री.योगेश्वरी देवीचे मंदिर सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले आहे. मात्र दर्शन घेत असताना कोविड विषयक नियमांचे पालन करुनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारी (ता.०५) सकाळी ७ वाजता श्री.वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती. दरम्यान वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले की, भाविकांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच दर्शनासाठी यावे. दर्शनासाठी आल्यानंतर गर्दी करु नये, योग्य ते अंतर ठेवावे अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल म्हणून भाविक भक्तांनी सर्व नियमांचे पालन करुनच दर्शन घ्यावे, मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक; डिजिटल हल्ल्याने खळबळ, समर्थक आक्रमक!

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Marathi Live News update: अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा, दुसऱ्या दिवशीही गोंधळ

Konkan Heritage: कोदवली येथे तीन मराठाकालीन शिलालेख; फेब्रुवारी १८४५ मध्ये झाला श्री शंकरेश्वराचा जीर्णोद्धार, बंदर प्रशासनाचा इतिहास

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

SCROLL FOR NEXT