bajarang sonawane pankaja munde esakal
मराठवाडा

Beed Loksabha election 2024 : ''बीडचे 'हे' अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत नकोत'', पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांची आयोगाकडे मागणी

संतोष कानडे

मुंबईः बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग करुन बोगस मतदान करण्याचे प्रकार घडलेले आहेत. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतदानाच्या अगोदरच परळी, धारुर आणि केज तालुक्यात बोगस मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केलं. मतदानानंतर अनेक ठिकाणचे बोगस मतदानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यांच्या तक्रारीचीही जिल्हा प्रशासनाने किंवा निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही. आता मजमोजमीसाठी तरी जागे व्हा, आणि काही विशिष्ट अधिकाऱ्यांना मोतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

'साम'शी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, ७ मे रोजी मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ज्या गावात बोगस मतदान होण्याची भीती वाटत होती, त्या गावांची यादी मी दिली होती. परंतु जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. त्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली होती. त्यांनी काहीही ऐकलं नाही. मतदानाच्या दिवशीसुद्धा मी बोगस मतदानाची माहिती दिली होती. १३ तारखेला बूथ कॅप्चरिंगचे प्रकार घडले होते. त्याबद्दलही मी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना कळवलं होतं. परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, त्यामुळे आज ही वेळ आली आहे.

''बोगस मतदानाचे पुरावे आहेत''

सोनवणे पुढे म्हणाले की, फेर मतदानाची मागणी केली आहे, पुरावा म्हणून इंजेगाव येथे मुक्ताराम गवळी यांनी लाईव्ह येऊन सगळं सांगितलेलं होतं. दहीफळे नावाच्या पीआय यांनीही लक्ष दिलं नाही. परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे बीड जिल्ह्यातलेच आहेत. परंतु ते असं का काम कराएत हे मला माहिती नाही. दहीळफे हेदेखील बीड जिल्ह्यातले आहे.

''विशेष म्हणजे बीडच्या जिल्हाधिकारी मुंडे ह्या देखील परळीतल्या कन्हेरवाडी येथील आहेत. त्यांच्या पतीचं गाव कन्हेरवाडी आहे. बरेच अधिकारी बीड जिल्ह्यातले रहिवाशी आहेत. यांचा थेट सहभाग निवडणूक प्रक्रियेमध्ये होतेय. नियमानुसार त्यांना बीड जिल्ह्यात ठेवता येणार नाही.''

बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की, कलेक्टर, एसपी आमच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत. मला गार्डसुद्धा दिला नाही. नंतर दिला तो दुसराच गार्ड दिला. मागच्या काळात मी तीन ते चार पत्र निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. साळवी नावाचे एक वर्ग दोनचे अधिकारी आहेत. त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. बूथ कॅप्चरिंगबद्दल ते बोलत आहेत. त्यांनाही संरक्षण दिलं पाहिजे. एवढे पुरावे असतानाही काहीच झालं नाही, असं जिल्हाधिकारी सांगत आहेत. असंच सुरु राहिलं तर लोकशाहीवरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही.

निवडणूक आयोगाकडे पुन्हा एक तक्रार

''रविवारी सकाळी पुन्हा मी एक आयोगाला पत्र दिलं आहे. त्यात जिल्हाधिकारी मुंडे, परळीचे तहसीलदार मुंडे आणि दहीफळे नावाचे पीआय बीडचेच आहेत, असं नमूद केलं आहे. याशिवाय बांगर नावाच्या अधिकाऱ्याने गेवराईत दहशत निर्माण करुन मारहाण केली होती. या अधिकाऱ्यांना मतमोजणीच्या प्रक्रियेत ठेवू नये अशी मागणी केली आहे''.

''हेच अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत राहिले तर निकाल उलटा-सुलटा करतील, त्यांच्यावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर राहिलं ठेवलं पाहिजे.'' अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT