Beed Majalgaon dam Waiting for rain 40 percent water 
मराठवाडा

बीड : माजलगाव धरणाला पावसाची प्रतीक्षा

धरणाचा साठा चाळीस टक्क्यांवर : मागील वर्षी जुलैत होता ५१ टक्के साठा

कमलेश जाब्रस

माजलगाव : खरीप हंगामाचे दोन महिने संपत आले तरी तालुका परिसरात मोठा पाऊस झालेला नाही. तर धरण कार्यक्षेत्रात देखील हीच परिस्थिती असून दोन महिन्यांत पडलेल्या पावसावर धरणाचा पाणीसाठा चाळीस टक्क्यांवर गेला असून धरण कार्यक्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चांगला पाऊस बरसला. आता दुसरा महिला संपत आला तरी देखील पाहिजे तसा मोठा पाऊस झालेला नाही. असे असले तरी मागील तीन वर्षांपासून सतत धरण भरत असल्याने भूगर्भातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्रात देखील वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी उसासह फळबागांची लागवड केली आहे.

मागील वर्षी आणि यावर्षी देखील या धरणाच्या पाण्यावर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली आहे. दरम्यान पावसाळ्याचे दोन महिने संपत आले असून मागील वर्षात या महिन्याची आकडेवारी पाहिली तर जुलै २०२१ मध्ये धरण ५१ टक्यांवर होते. तर यावर्षी ४० टक्यांवर आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान या धरणातील पाण्याचा लाभ बीड, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांना सिंचनासाठी होतो. त्याचबरोबर बीड, माजलगाव शहर व पुनर्वसित अकरा खेड्यांना धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा देखील केला जातो.

माजलगाव धरण सद्यःस्थिती

  • टक्केवारी : ४०.३८ टक्के.

  • पाणी पातळी : ४२९ मीटर.

  • उपयुक्त पाणीसाठा : १२६ दलघमी.

  • एकूण पाणीसाठा : २६८ दलघमी.

धरणाच्या पाणीपातळीत जसजशी वाढ होईल तसे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. ती गर्दी टाळण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी धरणावर तैनात आहेत धरणावरील सीसीटीव्ही यंत्रणा, पथदिवे कार्यान्वित आहेत. धरणाचा पाणीसाठा चाळीस टक्यांवर गेला आहे.

- बी.आर. शेख, धरण अभियंता, माजलगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: सिंहस्थाच्या पर्वावर उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला ‘बूस्ट’! नाशिक-शिर्डी-त्र्यंबक ‘धार्मिक कॉरिडॉर’ने जोडले जाणार, पर्यटनवाढीची संधी..

'ये बात रोशन!' घराबाहेर काढण्याच्या टास्कमध्ये रोशन तन्वी भिडणार, धोका दिल्याने रोशन सगळ्यांसमोर तन्वीला सुनावणार, नेटकरी खुश

Republic Day Marathi Wishes 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक संदेश

Elon Musk Fraud : लग्नाचं आमिष, महागडे गिफ्ट्स...'इलॉन मस्क' ने मुंबईच्या महिलेला फसवलं? 16 लाख रुपये लुटले, पाहा जगभर गाजलेलं प्रकरण काय

Latest Marathi news Live Update : पुणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे भाकरी फिरवणार

SCROLL FOR NEXT