crime sakal
मराठवाडा

बीड : मित्रानेच केला दगडाने ठेचून तरुणाचा खून

चोरीच्या मोबाइलच्या पैशावरून कृत्य

सकाळ वृत्तसेवा

बीड : चोरीच्या मोबाइलच्या पैशावरून मित्राने एका तरुणाचा भर रस्त्यावर दगडाने ठेचून भरदिवसा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील खंडेश्‍वरी भागात घडली. घटनेनंतर खून करणारा आरोपी तरुण हा घटनास्थळीच थांबून होता. पेठ बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. उत्तरेश्वर ऊर्फ पश्या हौसराव भोसले (वय २५, रा. बोरखेड, ता. बीड, ह. मु. नूर कॉलनी गांधीनगर, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, दीपक संतोष भोरे (वय १९, रा. खडकपुरा, पेठ बीड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

उत्तरेश्‍वर ऊर्फ पश्या भोसले हा आपल्या मित्रांसोबत खंडेश्वरी भागात दुपारी गेला होता. त्या ठिकाणी या सर्वांनी नशापान केले. यावेळी चोरीच्या मोबाइलच्या पैशावरून त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर दीपक भोरे याने उत्तरेश्‍वर ऊर्फ पश्या भोसले याच्या डोक्यात दगड घालून त्याला मारहाण केली. यामध्ये तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मारेकरी तरुण दीपक भोरे हा तेथेच होता. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पेठ बीड पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT