sakal
मराठवाडा

बीड: लाभार्थींची नवी यादी प्रसिद्धीला मुहूर्त लाभेना

आष्टीत संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा

आष्टी : तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ समिती अंतर्गत नव्याने मंजूर केलेल्या लाभार्थींची यादी दोन महिने उलटूनही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे गरजू लाभार्थींची प्रकरणे मंजूर होऊनही त्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन ते अडीच वर्षे या समितीची बैठकच होऊ शकली नाही.

ता. १७ जुलैला समितीची बैठक झाली. या बैठकीत सुमारे १,७०० नवीन प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. नियमानुसार मंजूर प्रकरणांची यादी लगेचच तहसील कार्यालयाच्या फलकावर डकविणे अपेक्षित होते. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. समिती अध्यक्ष व सदस्यांनी सर्व संमतीने विधवा, अपंग व श्रावणबाळ समिती लाभार्थींची प्रकरणे मंजूर केली आहेत. दरम्यान, लाभार्थींची प्रकरणे मंजूर केल्यानंतर ता. २८ जुलैला यमाजी दशरथ खंडागळे व दादासाहेब आश्रुबा गोल्हार (रा. कापसी) यांनी यादीवर आक्षेप घेत तहसील कार्यालयात तक्रार दाखल केलेली आहे.

परंतु, या आक्षेपांबाबतही अद्याप पुढील कार्यवाही झालेली नाही. कोरोना काळात गोरगरीब व वंचित लाभार्थींना तातडीने अनुदान मिळणे गरजेचे आहे. परंतु, प्रशासकीय पातळीवर यादीच प्रसिद्ध न झाल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. याबाबत काय तो निर्णय घेऊन मंजूर लाभार्थींची यादी तत्काळ प्रसिद्ध करण्यासंदर्भात आमदार आजबे यांनीही अधिकाऱ्यां ना सूचना दिलेल्या आहेत. समिती अध्यक्ष व सदस्यांनीही अधिकाऱ्यांना अनेकवेळा विनंती केली. परंतु, अद्याप यादी प्रसिद्ध झाली नाही.

"पालकमंत्री धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांनी समिती गठीत केल्यानंतर तालुक्यातील सर्व प्रकरणांसंदर्भात बैठक घेतली व नवी १,७०० लाभार्थींची प्रकरणे मंजूर केली. परंतु, यादी प्रसिद्धीस विलंब होत आहे. मंजूर लाभार्थींची यादी रविवारपर्यंत (ता. २६) प्रसिद्ध न केल्यास मी सोमवारपासून (ता. २७) तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे."- शिवाजी नाकाडे, सदस्य, संजय गांधी व श्रावणबाळ योजना समिती

"नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांच्या याद्या तयार करण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. येत्या चार-पाच दिवसांत याद्या प्रसिद्ध करून तहसील कार्यालयात लावण्यात येणार आहेत."-नीलिमा थेऊरकर, नायब तहसीलदार, आष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT