Bajrang Sonavane sakal
मराठवाडा

Bajrang Sonavane: नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे बनले सेलिब्रिटी, सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची रिघ

Bajrang Sonavane Loksabha Result : बघता बघता शेकडो लोकांनी त्यांना पाहुन गर्दी केली |Hundreds of people gathered to see him

दीपक बारकूल

Beed Loksabha Result News: बीड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे बनले सेलिब्रिटी.येरमाळा मार्गे कुर्डुवाडी येथुन दिल्लीकडे जात असताना छत्रपती शिवाजी चौरस्त्यावर चहा पाण्यासाठी हॉटेल धनलक्ष्मी येथे थांबले असता त्यांना पाहून लोकांनी अभिनंदन करण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.बघता बघता शेकडो लोकांनी त्यांना पाहुन गर्दी केली.

बीड लोकसभेच्या अटीतटीच्या, चूरशीच्या कालच्या निकाला दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाल्याच्या बातम्या समजल्याने बीडच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.रात्री उशिरापर्यंत जो तो सोशलमीडियाच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांचे काय झाले यासाठी उशिरापर्यंत ऑनलाईन होते.

यामुळे अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती.रात्री दहावाजे दरम्यान भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे यांचा सात हजार मताने बजरंग सोनवणे परभव केल्याच्या बातम्या येई पर्यंत लोकांनी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा केली आणि आज प्रत्यक्षात त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग येरमाळा वासियांनां आला.

महाविकास आघाडीचे राज्यातील सर्व नवनिर्वाचित खासदार आज बुधवारी पाच वाजता कुर्डुवाडी येथून रेल्वेने दिल्लीकडे रवाना होत असताना येरमाळा चौरस्त्यावरील एका हॉटेलवर थांबले होते ते बार्शी येथील आर्यन कारखाण्याकडे जाताना या ठिकाणी नेहमीच थांबतात.आज त्यानां पाहून लोकांनी चांगलीच गर्दी केली.

लोक त्यांच्याशी हस्तांनदोलन करुन अभिनंदन करण्यास उत्सुक दिसत होते,तर कांहीनी त्यांचा सोबत फोटोसेशन केले तर कोणी त्यांच्या सोबत सेल्फीसाठी घेण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहून बजरंग सोनवणे खासदार नव्हे तर सेलिब्रेटीचं आहेत असे चित्र लोकांच्या गर्दीवरून निर्माण झाले होते.

बजरंग सोनवणे हे कळंबचे जावई तर केजच्या येडेश्वरी साखर कारखाण्याचे चेअरमन आसल्याने बार्शी येथील आर्यन कारखाना त्यांनीच घेऊन गेल्या वर्षी चाचणी तर यावर्षी हंगामी यशस्वी गळीत हंगाम घेतल्याने त्यांचा परिसरात चांगला जनसंपर्क आहे,त्यांची यशस्वी कारखानदार म्हणुन ओळख आहे.त्यांनी जमलेल्या लोकांना वेळ दिल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT