pik vima  sakal
मराठवाडा

Beed News :त्रुटी म्हणत कंपनीकडून पीकविम्याचे अर्ज परत; ‘सीएससी’चालकांनाही कमिशनची प्रतिक्षा

परंतु, तांत्रिक दोषांमुळे तीन दिवसांची मुदतवाढ (ता. तीन आॅगस्ट) पर्यंत देण्यात आली.

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी - एक रूपयात पीकविमा’ ही शासनाने जाहीर केलेल्या योजनेसाठी खरीप हंगामातील शेतकऱ्यांची नोंदणी केलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) चालकांना प्रती अर्ज ४० रुपये देण्यात येणार होते. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप सेवा केंद्र चालकांना कमिशनची रक्कम देण्यात आलेली नाही. उलट विमा कंपनीने त्रुटी दाखवून शेतकऱ्यांचे अनेक अर्ज परत केले आहेत. विमा कंपनीच्या या गलथान कारभाराबद्दल सीएससी केंद्र चालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दुष्काळ व अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीकविमा ही योजना जाहीर केली. यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत (सीएससी) नोंदणी करून पीकविमा योजनेत सहभाग नोंदविता येणार होता. यासाठी अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ अशी होती.

परंतु, तांत्रिक दोषांमुळे तीन दिवसांची मुदतवाढ (ता. तीन आॅगस्ट) पर्यंत देण्यात आली. या कालावधीत सर्व्हरमधील बिघाडामुळे सीएससी चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक वेळा सर्व्हर डाऊन होत असल्याने रात्रीचे जागरण करून केंद्र चालकांना हे काम पूर्ण करावे लागले. यासाठी तालुक्यातील केंद्र चालकांनी सुमारे ८५ हजार शेतकऱ्यांचे एक रुपयात पीकविमा योजनेसाठीचे अर्ज आॅनलाईन केले.

बीड जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांचे अर्ज सामूहिक संमतिपत्र जोडा असे कारण लिहून सेवा केंद्रांकडे परत पाठवीत आहे.

वास्तविक, सातबारावर एकाच नावाची नोंद असल्यास त्याला सामूहिक संमतिपत्र जोडण्याची आवश्यकता नाही. मात्र, यानंतरही विमा कंपनीमार्फत अर्ज परत पाठविण्यात येत आहेत. सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज एक रुपयात भरून द्यावेत, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अन्यथा सेवा केंद्र चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

याबाबत ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक बाबासाहेब इनकर यांच्याशी संपर्क साधला असता माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.

एक रूपयात पीकविमा योजनेसाठी कडा व परिसरातील अनेक गावांतील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांचे अर्ज आॅनलाईन करून दिले आहेत. मात्र, अर्ज करून दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप प्रती शेतकरी मिळणारे कमिशन मिळालेले नाही.

-अतुल कर्डिले, सीएससी केंद्रचालक, कडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT